वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या मनगटावर लाडक्या भगिनींच्या प्रेमाची राखी; "माता-भगिनींचे आशीर्वाद हेच माझे खरे सुरक्षा कवच" - हसन मुश्रीफ
schedule28 Aug 26 person by visibility 159 categoryसामाजिक
कागल : लाडक्या बहिणींच्या संरक्षणाचे आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्त कागल शहरासह ग्रामीण भागातील माता-भगिनींनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी हजेरी लावत त्यांच्या मनगटावर प्रेमाची राखी बांधली. यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या लाडक्या भाऊरायाचे औक्षण करून त्याच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना केली.
बेलेवाडी मासा येथील महिलांसोबतच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बहीणजींनी विशेष उपस्थित राहून मुश्रीफ यांना राखी बांधली आणि ओवाळणी केली. बहिणींच्या या स्रेहवर्षावाने आणि अपार प्रेमाने मंत्री मुश्रीफ भावूक झाले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "राजकारणात आणि समाजकारणात काम करत असताना माझ्या लाडक्या माता-भगिनींचे आशीर्वाद आणि त्यांची पुण्याई हीच माझ्या पाठीशी खमंग कवचकुंडलासारखी उभी आहे. माता-भगिनींच्या याच अपार आशीर्वाद आणि प्रेमामुळे आजवरची माझी राजकीय व सामाजिक वाटचाल अत्यंत यशस्वी होऊ शकली आहे."
बहिणींच्या या स्रेहसंमेलनाने आणि रक्षाबंधनाच्या पवित्र बंधनाने कागलमधील वातावरण अत्यंत भावनिक आणि उत्साही बनले होते.