SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरविल्यासंवाद, जनजागृतीच्या माध्यमातून तृतीयपंथींचे समावेशन शक्य: कुलगुरू डॉ. राजनीश कामतडी. वाय. पाटील विद्यापीठात डिझाईनच्या नव्या पर्वाला सुरुवातपूनमताई तोडकर यांच्याकडे 'नरेंद्र मोदी विचार मंच'च्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची धुरा!कौशल्याधारित शिक्षणच समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे साधन: एम. बी. शेख यांचे प्रतिपादनकोल्हापूर आणि इचलकरजीत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी: शोभायात्रेतून विश्वशांती अन् सलोख्याचा संदेश!क्रांतीचे उड्डाण: जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाची ऐतिहासिक झेप!हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा : विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिरनेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत९८ लाखांच्या गंडा घालणारा 'लाईफमार्क'चा ठग जेरबंद! नाव बदलून लपलेल्या मुख्य संचालकासह एजंट पोलिसांच्या जाळ्यात

जाहिरात

 

भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरविल्या

schedule27 Aug 26 person by visibility 162 category

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीवरील स्मशानभूमी परिसरातील धोकादायक झालेल्या कमानी तातडीने उतरविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. यासाठी भाजपा सचिव अमित शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील दोन्ही कमानींचा रंग उडालेला असून, त्यांच्या पाया तसेच बांधकामाला तडे गेल्याने त्या धोकादायक बनल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कमानी तातडीने उतरविण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती.

या पाठपुराव्याची दखल घेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील दोन्ही धोकादायक कमानी पूर्णपणे उतरविण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या कार्यवाहीबद्दल भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याबद्दल भाजपा युवा मोर्चाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांची सोडवणूक करण्यास भाजपा युवा मोर्चा कटिबद्ध आहे, असे भाजपा सचिव अमित शिंदे यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes