SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर: राजारामपुरीतील जबरी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड; २ लाखांचा मुद्देमाल जप्तमी अनेक वर्षे शेती करतोय परंतु; कृत्रिम बुद्धिमत्तेसारखा चांगला ऊस आयुष्यात पाहिला नाही : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन हिंदी पत्रकारिता दिन: लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गौरवशाली वारसापुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून 70 कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती; सेवानिवृत्त झालेल्या 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कारबांबवडे येथे 5 जून रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजनकोल्हापुरी चपलेचा डंका सातासमुद्रापार! ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला तब्बल ११ जागतिक पुरस्कार; 'ब्लॅक एलिफंट'वरही कोरले नाव!२५० कोटी रुपयांच्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण ; कोल्हापूरमधील रुग्णसेवेला नवे बळकसबा बावडा परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाईजगाच्या कल्याणासाठी मनुष्याने शाश्वत जीवनशैली पुढे घेवून जाणे आवश्यक : सिध्दार्थ शिंदे

जाहिरात

 

पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी सुधारित कार्यक्रम घोषित

schedule01 Dec 25 person by visibility 291 categoryराज्य

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रानुसार 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी नव्याने (De-Novo) मतदारयाद्या तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम घोषित केलेला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 3 डिसेंबर रोजी प्रारुप मतदारयादी जिल्ह्यातील सर्व सहा. मतदार नोंदणी अधिकारी (सर्व विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी AC ERO) कार्यालये, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सन 2020 मधील निवडणुकीवेळी पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आलेल्या सर्व मतदान केंद्रांवर दर्शनी भागात प्रसिध्द करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 3 ते 18 डिसेंबर याप्रमाणे आहे.

निवडणुकीसाठी नाव नोंदणी केलेल्या सर्व मतदारांनी प्रारुप मतदारयादीचे अवलोकन करुन त्यांचे नाव व नावातील इतर तपशिलाबाबत खातरजमा करावी. नाव व इतर तपशिलात दुरुस्ती असल्यास त्याबाबत नमुना 8 भरुन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पदनिर्देशित अधिकारी (Designated Officer) यांचेकडे सादर करावा. एखाद्या नावाबाबत दावे व हरकती दाखल करावयाची असल्यास त्याबाबत नमुना 7 चा वापर करावा.

प्राप्त दावे / हरकतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सहा. मतदार नोंदणी अधिकारी (सर्व विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी ACERO) यांचे कार्यालयात नेमले दिनाकांस सुनावणीअंती हरकतदार, ज्यांचे नावाबाबत हरकत घेण्यात आली आहे ती व्यक्ती अशा सर्वसंबंधितांचे म्हणणे ऐकून घेवून व सादर केलेले पुरावे विचारात घेवून अंतिम निर्णय घेण्यात येईल.

नमुना - 7 व नमुना -8 चे कोरे फॉर्म्स जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर kolhapur.gov.in व निवडणूक शाखेमध्ये तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध आहेत. 

प्राप्त दावे व हरकती 5 जानेवारी 2026 पर्यंत निकाली काढून 12 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी वरीलप्रमणे विर्निदिष्ट ठिकाणी प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीता गायकवाड यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes