SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तांबट कमान ते तलवार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाईकोल्हापुरात गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक; १.५ लाखांचा मुद्देमाल जप्तकोल्हापुरात बकरीद (ईदुल अजहा) मोठ्या उत्साहात साजरी; मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर पारंपरिक पद्धतीने नमाज पठणडीवायपी पॉलिटेक्निकचे योगेश घुलेची 'गुगल स्टुडन्ट अँबेसिडर ' म्हणून निवडकेआयटीच्या वतीने नूतन कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांचे उत्साहपूर्ण स्वागतमंत्री हसन मुश्रीफ यांना बकरी ईदनिमित्त मान्यवरांसह नागरिकांच्या शुभेच्छा.....! मंत्री हसन मुश्रीफ शनिवारी शेतकऱ्यांसमवेत करणार शिवारफेरीरेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल; सीझन सहाचा भव्य आणि दिमाखदार समारोप​"त्याग आणि समर्पण: स्वतःमधील दुर्गुणांची कुरबानी हाच खरा धर्म"जागतिक व्यासपीठावर महिलांच्या आरोग्य हक्कांचा जागर: आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन

जाहिरात

 

तांबट कमान ते तलवार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

schedule28 May 26 person by visibility 107 categoryमहानगरपालिका

◼️6 डिजीटल बोर्ड, 9 हातगाड्या व 3 केबीन जप्त

कोल्हापूर : शहरातील अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेने आज पुन्हा कडक कारवाई करत तांबट कमान ते तलवार चौक परिसरातील अनधिकृत फेरीवाले, डिजिटल बोर्ड व केबिन हटविले. विभागीय कार्यालय क्र. 1 (गांधी मैदान) व अतिक्रमण निर्मूलन पथकाने या मोहिमेत 6 अनधिकृत डिजिटल बोर्ड, 9 हातगाड्या आणि 3 केबिन जप्त करण्यात आले. तर 24 हातगाडीधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेतले. महानगरपालिकेच्या ठराव क्र. 83, दि. 18 मे 2026 नुसार अतिक्रमण कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज जप्त करण्यात आलेले साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आले आहे.

  ही कारवाई महापौर रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. 

या कारवाईमध्ये उपशहर अभियंता महादेव फुलारी, कनिष्ठ अभियंता अनिरुद्ध कोरडे, चेतन आरमाळ, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. 1 मधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

 महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यवसायधारक तसेच रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्स व अतिक्रमणांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी आपले अतिक्रमण त्वरित स्वतःहून हटवावे, अन्यथा जप्त करण्यात आलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes