SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
योग्य आहार, व्यायाम व झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री : ‘लॉरस लॅब’ चे संस्थापक डॉ. सत्यनारायण चावा यांचे प्रतिपादन; डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन कसबा बावडा पंप हाऊस येथील दुरुस्ती मुळे ई वॉर्डचा १३ जुलैला पाणीपुरवठा बंदशहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर रूपाराणी निकमराजूर ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन सुधारित प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरमहात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड; सर्वोच्च पॅकेज ₹२७.५० लाखकोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठामातृ सुरक्षा दिन: मातृत्व जपण्याचा संकल्प'क्लायमेट सत्याग्रह' जनतेच्या माध्यतातून पुढे जाणे आवश्यक - प्रा.चेतन सिंह सोलंकीगंजीगल्ली परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई

जाहिरात

 

कसबा बावडा पंप हाऊस येथील दुरुस्ती मुळे ई वॉर्डचा १३ जुलैला पाणीपुरवठा बंद

schedule10 Jul 26 person by visibility 126 categoryमहानगरपालिका

  कोल्हापूर : कसबा बावडा येथील संप हाऊसची व बी.पी.टी टँकची गळती काढण्याचे काम सोमवार, दि.13 जुलै 2026 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ई वॉर्ड भागातील कावळा नाका वितरण शाखेअंतर्गत पाणी पुरवठा होणा-या भागातील नळ कनेक्शन धारकांना दैनंदिन पाणी पुरवठा होवू शकणार नाही. तसेच मंगळवार दि.14 जुलै 2026 रोजी होणारा पाणी पुरवठा हा एक दिवस आड नियोजनाप्रमाणे अपुरा व कमी दाबाने होईल. रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी कावळा नाका वितरण शाखेअंतर्गत येणा-या सर्व भागातील नागरिकांना एक आड एक दिवस पाणी पुरवठा न होता संपूर्ण भागास पाणी पुरवठा होणार आहे.

  कावळा नाका वितरण अंतर्गत असणा-या भगवा चौक, संपुर्ण बावडा, मधुमालती कॉलनी, डी.वाय.पाटील रोड, बिरंजे पाणंद, कदमवाडी, चौगले गल्ली, उलपे मळा, कनाननगर, पोवार मळा, रमणमळा, न्यु पॅलेस, धैर्यप्रसाद, कारंडे मळा, सर्किट हाऊस, ताराबाई पार्क, लाईनबाजार, सदरबाजार, विचारे माळ, कावळा नाका, टेंबलाईवाडी, स्टेशन रोड, बापट कँप, लोणार वसाहत, रुईकर कॉलनी, रुक्मीणी नगर, मार्केट यार्ड, लिशा हॉटेल, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, बाबर हॉस्पीटल, शिवाजी पार्क या भागात पाणी पुरवठा होऊ शकत नाही.

  तरी संबधीत भागातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून व अपव्यय टाळून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes