SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'स्ट्रोक' रुग्णांसाठी " रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन” प्रकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याच्या आरोग्यमंत्र्याच्या सुचनारोटरी क्लब कोल्हापूर हेरिटेज आणि आरसीकेओपी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू महिलांना पिंक रिक्षा वाटपअर्थशास्त्र अधिविभागात माजी विद्यार्थी मेळावाकामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘POSH’ कायद्याची कडक अंमलबजावणी; राज्यभर तपासणी मोहीमगांधीनगर येथे तंबाखूविरोधी धडक मोहीम ; २७ जणांवर कारवाई डी. वाय. पाटील फिजिओथेरपीला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदकेंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण धोरणाविरोधात जय शिवराय किसान संघटनेची कोल्हापुरात पत्रकार परिषद; नवीन कायद्यावर कडाडून टीकाधक्कादायक! 'तो' कुटुंबासह कोकण दर्शनाला गेला अन मागे मित्रानेच लुटले घर; कोल्हापुरात १५ लाखांच्या दागिन्यांसह एक गजाआडडीकेटीईच्या विद्यार्थ्यांची हरियाणा येथील बूटकॅम्पमध्ये चमकदार कामगिरीराष्ट्रीय डेंग्यू दिवस: जनजागृती आणि सतर्कतेची गरज

जाहिरात

 

सिद्धार्थनगरातील दंगल : दोन्ही गटांतील ४०० जणांवर गुन्हा; बंदोबस्त कायम

schedule24 Aug 25 person by visibility 486 categoryगुन्हे

कोल्हापूर : सिद्धार्थनगर कमानीजवळ भारत तरुण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त लावलेले फलक आणि साउंड सिस्टमच्या वादातून झालेल्या दगडफेकप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही गटांतील सुमारे ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. यातील ३१ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.  दरम्यान, दोन्ही गटांनी समजुतीची भूमिका घेतल्याने शनिवारी (दि. २३) तणाव निवळला. दगडफेकीत सात वाहनांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाल्याचे समजते. परिसरात पोलिसांनी बंदोबस्त कायम ठेवला आहे.

शुक्रवारी दोन गटांतील वादाचे पर्यवसान दगडफेक आणि जाळपोळीत झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आणून दोन्ही गटांतील सुमारे ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करणे, मालमत्तांचे नुकसान करणे, शस्त्रे नाचवून दहशत माजवणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले आहेत. 

दरम्यान अधीक्षक कार्यालयातील बैठकीत पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दोन्ही गटांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले. बैठकीत दोन्ही गटांतील नेत्यांनी सलोखा कायम राखण्याचे आश्वासन दिले. आरपीआयचे उत्तम कांबळे, डी. जी. भास्कर, सुभाष देसाई, विकी कांबळे, रजनिकांत सरनाईक, स्वप्निल पन्हाळकर, जय पटकारे, डॉ. शशिकांत खोडशे, स्वाती काळे, सीमा कांबळे. माजी नगरसेवक आदिल फरास, रियाज सुभेदार, नंदकुमार मोरे, कादर मलबारी, जाफर बाबा, शकील नगरजी, इसाक पठाण, मुस्ताक मलबारी यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes