+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustबेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबई मनपा आयुक्तांना सूचना adjustबापट कॅम्पमधील मूर्तिकारांना मार्केट यार्डात निवारा शेड उपलब्ध करा : सतेज पाटील यांच्या सूचना; पूरग्रस्त भागाची केली पाहणी adjustकाँग्रेसच्या समन्वय समितीत आमदार सतेज पाटील adjustबनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस adjustराज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा adjust'‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस adjustघाबरुन न जाता वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करा; शासन आपल्या पाठीशी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला पूरग्रस्तांना धीर adjustकोल्हापुरातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प परिसराती 228 नागरीकांचे स्थलांतर adjustकारगिल ऑपरेशन विजय भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक : कॅप्टन डॉ. अमित रेडेकर; के.एम.सी. कॉलेज व गोखले कॉलेज यांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा adjustडीकेटीईच्या १४ टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची रिड अँण्ड टेलर कंपनीमध्ये निवड
1000867055
1000866789
schedule26 Oct 22 person by visibility 788 categoryसंपादकीय
गतवर्षी दीपावली पाडव्याचा तेजोमय मुहूर्त साधत कोल्हापुरात दिमाखदारपणे एसएमपी न्यूज पोर्टलचा प्रारंभ झाला. गतवर्षातील वाटचालीकडे मागे डोकावून पाहत असताना अनेक सकारात्मक काही आव्हानात्मक प्रश्न उभे ठाकले मात्र आव्हानाला सामोरे जात असताना प्रबळ इच्छाशक्ती आणि वाचक, जाहिरातदार यांचे पाठबळ लाख मोलाचे ठरले असेच म्हणावे लागेल. गतवर्षी दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूरकरांच्या सेवेत दिमाखात रुजू झालेल्या एसएमपी न्यूज पोर्टलने आज दीपावली पाडव्याला प्रथम वर्धापन दिन साजरा करत असून साडेसहा लाख व्हिजिटरांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच एसएमपी न्यूज नेटवर्क युट्युब चॅनेल ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

करवीरनिवासीनी अंबाबाई, दक्खनचा राजा जोतिबाची कृपा, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू राजांच्या पदस्पर्शनि पुनित झालेल्या या भूमीला ऐतिहासिक आणि पुरोगामी विचार अंगिकारलेल्या करवीरनगरीत गतवर्षी आम्ही या क्षेत्रामध्ये पदार्पण केले त्यावेळी कोरोना संकटानंतर परिस्थिती अनलॉक होऊन उद्योगधंद्याचे चक्रे फिरू लागली होती आणि हळूहळू अर्थ व्यवस्था सावरू लागली होती. अशा परिस्थितीत आम्ही उचललेले पाऊल आव्हानात्मक होते पण कष्ट करण्याची तयारी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आम्हाला करवीर नगरीतून मिळाले. 

वृत्तपत्र श्रेत्रातील अनुभव पाठीशी असला तरी डिजिटल मीडियाचा क्षेत्र आमच्यासाठी नवीन होते. मात्र बदलत्या स्वरूपात काम करतानाची सवय आम्हाला होऊन गेली. यातून वाचक वर्ग जोडला गेला त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क अथवा मोबाईल वरती सामाजिक राजकीय शैक्षणिक आदी प्रश्न बाबत होणारे संभाषण, एसएमपी न्यूज विषयी व्यक्त होणाऱ्या भावना आम्हाला प्रेरणादायी, मार्गदर्शन, आणि विश्वास वाढणाऱ्या ठरल्या.

सामाजिक, राजकीय, औद्योगिक, वैद्यकीय, क्रीडा आदी क्षेत्रातील बातम्या आम्ही निष्पक्ष, परखडपणे मांडणी करत असताना त्यातील अचूकता टिपण्याचा आम्ही प्रयत्न केला. यामुळे वाचकांची विश्वासार्हता वाढली यामुळे वाचक हितचिंतक यांचे पाठबळ आम्हाला आमच्या एस एम पी न्यूज नेटवर्कच्या 'एकच लक्ष... सदैव दक्ष' या बिद्र वाक्याप्रमाणे सार्थकी ठरवू शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भविष्यातील आव्हानात्मक कार्य आपल्या पाठबळाच्या जोरावर नक्कीच पेलू शकू असा विश्वास आहे.