SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
यश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहितीजप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलावशक्तीपीठ महामार्ग विरोधी लढा : बांधा ते वर्धा मे अखेरीस संघर्ष यात्रा काढणार : आमदार सतेज पाटीलकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे एअर रायफल ट्रेनिंगचे 10 मे पासून प्रशिक्षण सुरुडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात बौद्धिक संपत्ती अधिकार कक्षाची स्थापना; मायक्रेव्ह कन्सल्टंसी समवेत सामंजस्य करारसकारात्मक सुरुवात, सातत्य, संयम ठेवा स्वप्न साध्य होईल : ईशा झंवर; केआयटी प्रचंड उत्साहामध्ये ई-समीट संपन्नकोल्हापूर महापालिकेसमोर खेळणी रचून 'आप'चे आंदोलन; उद्यानातील मोडकी खेळणी बदलण्याची मागणी

जाहिरात

 

भारताच्या सैन्यदलाला सलाम ! जयहिंद !!

schedule08 May 25 person by visibility 350 categoryदेश

यापूर्वी तीन वेळा युध्दात नांग्या ठेचल्यानंतरही पाकच्या दहशतवादी कारवाया कायमपणे  सुरूच आहेत,  नुकताच २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी नाहक हल्ला झाला,  आणि त्यामध्ये २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला; हे सर्व देशवासियांच्या दृष्टीने अत्यंत दुःखदायक आणि क्लेशकारक आहे. विशेष म्हणजे काश्मिरी जनतेच्या रोजीरोटीवरच हा हल्ला झाला आहे. या भ्याड हल्ल्यानंतर संपूर्ण भारतातं संतापाची लाट उसळली.

 या दहशतवादी हल्ल्यामुळे जगातील अनेक देशांनी खेद व्यक्त केला तर रशिया, फ्रान्स,जपान या सारख्या देशांनी पाकला जशास तसे उत्तर देण्यासाठी पाठींबा दिला. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण काश्मीर अस्वस्थ झाले आहे.  संपूर्ण काश्मीरची अर्थव्यवस्थाच यामुळे अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे. कारण काश्मीरची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. काश्मीर कितीही सुंदर असला तरी अशा घटनांमुळे कोणताही पर्यटक तेथे जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालणार नाही. हे सत्य नाकारता येणार नाही.
       "दहशतवाद्यांनी आमची रोजीरोटी काढून घेतली. आता आम्ही पुरते मोडून पडलो आहोत",  असे म्हणत काश्मीरमधील मुस्लिमांसह सर्व जातीधर्माच्या बांधवांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
        दहशतवादी हल्ला सुरू होता, तेव्हा सय्यद आदिल हुसेन हा काश्मिरी युवक तेथे होता. आदिल पर्यटकांना घोड्याची सफर घडवण्याचे काम करत होती होता. दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी "हे पर्यटक काश्मीरचे पाहुणे आहेत. ते निष्पाप आहेत. त्यांना मारू नका" म्हणून विनंती करत होता. पण अतिरेक्यानी ऐकलं नाही. सय्यद हुसैन ह्या आतंकवाद्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेऊ लागला तेव्हा त्यालाही गोळी घालून ठार करण्यात आले. काश्मीरमधील जनतेने पर्यटकांची कशी मदत केली याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल झाले आहेत, अर्थात ही सुध्दा एक बाजू देशवासीयांना पहायला मिळाली.


  ‌    दुसरीकडे एक विचारसरणी या दहशतवादी हल्ल्याला पुलवामा प्रमाणेच संधी म्हणून पाहत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते.  त्यांच्या बलिदानाचा फायदा भाजपने लोकसभेच्या निवडणुकीत विजयासाठी करून घेतला होता. हे सर्वज्ञात आहे.


       असाच प्रकार आता घडतो की काय, असे अनेकांना वाटत होते. दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या निष्पाप पर्यटकांबद्दल जातीधर्माचे कातडे डोळ्यावर ओढून घेणाऱ्यांना कसलेही सोयरसुतक नाही. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचे निमित्ताने हिंदू-मुस्लिम द्वेषाची होळी पेटवायचा कार्यक्रम काही शक्ती जाणिवपूर्वक पार पाडत आहेत, दहशतवाद्यांना विरोध करण्याऐवजी हे लोक मानवतेलाच विरोध करीत आहे. 
       जर या आतंकवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतर्गत लाथाळ्यांनी जर्जर झालेल्या पाकिस्तानला धडा शिकवून पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.


         २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला पर्यटकांवर नव्हता तर भारताच्या सार्वभौमत्वावर होता त्यामुळे भारत पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्यास कधी चोख प्रतिउत्तर देणार? असा प्रश्न विचारला जात होता. याचे प्रकट उत्तर बुधवारी मिळाले. बुधवार ७ मे रोजी रात्री १ वाजून २८ मिनिटांनी भारतीय वायू दलाने पाकव्याप्त काश्मीरवर हवाई हल्ले केले. भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळावर हल्ले करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात शेकडो दहशतवादी ठार झाले आहेत. भारताने केलेल्या या हल्ल्यात किती दहशतवादी ठार झाले याचा आकडा समोर आलेला नसला तरी या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याची शक्यता असून यात लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदचे अनेक मोठे दहशतवादी ठार झाले आहेत. भारतीय हवाई दलाने जवळपास २३ मिनिटे हल्ले केले. भारताने केलेल्या हवाई हल्ल्याला ऑपरेशन सिन्दुर असे नाव देण्यात आले. पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात ज्या भारतीय महिलांचे कुंकू (सिन्दुर) पुसले गेले त्या महिलांच्या सन्मानार्थ या मोहिमेला लष्कराने ऑपरेशन सिन्दुर असे नाव दिले. ऑपरेशन सिन्दुर यशस्वी करून भारतीय सैन्याने पहलगाम येथे मरण पावलेल्या २६ पर्यटकांच्या हत्येचा बदला घेतला आहे. भारतीय सैन्याची ही कामगिरी अभिमानास्पद आहे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याच्या या गौरवपूर्ण कामगिरीने १५० कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय सैन्याच्या या कामगिरीचा देशवासीयांना सार्थ अभिमान असून १५० कोटी भारतीय सैन्यदलापुढे नतमस्तक आहे. जो भारताकडे तिरक्या नजरेने पाहिल त्याला भारत घरात घुसून मारेल असा इशाराच भारताने जगाला दिला आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ॲक्शनला रीॲक्शन मिळणारच. हा भारत २०२५ चा भारत आहे हे भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ही मोहीम यशस्वी करून भारतीय सैन्यदलाने आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे. पाकिस्तानने जर पुन्हा भारताची कुरापत काढली तर त्याची शिक्षा पाकिस्तानला मिळेलच यात शंका नाही. ऑपरेशन सिन्दुर यशस्वी करणाऱ्या भारताच्या सैन्यदलाला सलाम ! जयहिंद !!

✍️ डाॅ. सुनीलकुमार सरनाईक. कोल्हापूर.

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes