सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेत संजय घोडावत स्कूल व नेव्ही चिल्ड्रन स्कूल चॅम्पियन
schedule11 Sep 24 person by visibility 271 categoryशैक्षणिक
अतिग्रे : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर सन 2024 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे व नेव्ही चिल्ड्रन स्कूल, गोवा या दोन्ही शाळा विभागून जनरल चॅम्पियन ठरल्या. द्वितीय क्रमांक न्यू हॉरीझोन स्कूल, नवी मुंबई व तृतीय क्रमांक आर्मी पब्लिक स्कुल, दिघी यांनी प्राप्त केला. संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती, सीबीएसई निरीक्षक श्री प्रमोद पाटील, यांच्या उपस्थित या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडला.
महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दिव दमन येथील 162 सीबीएसई शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आहेत. 1500 पेक्षा अधिक खेळाडू 14, 17 व 19 या वयोगटातील विविध ॲथलेटिक स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेमधून यशस्वी खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल व वैयक्तिक चॅम्पियन विद्यार्थी खालीलप्रमाणे -
14 वर्षे गट मुले - यश गडवी (न्यू हॉरिझोन स्कूल,गडहिंग्लज)
14 वर्षे गट मुली - विराजबाला भोसले( छ.शाहू विद्यालय कोल्हापूर)
17 वर्ष गट मुले - अविनाश गुड्डे (ASMS Empras स्कुल), कौशिक चौधरी (दिल्ली पब्लिक स्कूल, नागपूर), सिद्धार्थ गरांडे (तक्षशिला स्कूल, सांगली)
17 वर्षे गट मुली - यशश्री संकपाळ (विखे पाटील मेमोरियल स्कूल, पुणे), रिफात रहमान ( शांतिनिकेतन स्कूल कोल्हापूर)
19 वर्षे गट मुली - अंशा शर्मा भवन्स विद्यालय,नागपूर), अकिफा पठाण (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल,कोल्हापूर)
19 वर्षे गट मुले - अरमान यादव (नेव्ही चिल्ड्रन स्कूल, गोवा)
या बक्षीस समारंभ प्रसंगी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन, प्राचार्य श्री नितेश नाडे, प्राचार्य श्री अस्कर अली, सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. चेअरमन श्री संजय घोडावत, विश्वस्त श्री विनायक भोसले व संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती यांनी या क्लस्टर स्पर्धेमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.