+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule09 Jun 24 person by visibility 244 categoryशैक्षणिक
अतिग्रे : संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीने यावर्षीच्या नीट परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. हर्षवर्धन देशमुख या विद्यार्थ्यांने 720 पैकी 715 गुण प्राप्त करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तसेच धीर मेहता, सुधांशु खवरे, प्रतीक रामतीर्थकर , सत्यजित जगताप व संकेत सजागणे यांनी ७०५ गुण मिळवून ऐतिहासिक निकालाची परंपरा कायम राखली. 

 मोहंमददारिज पुणेकर व ईशान जोशी यांनी अनुक्रमे ७०१ व ७०० असे गुण मिळवले. संस्थेच्या एकूण ८ विद्यार्थ्यांनी ७०० पेक्षा अधिक गुण मिळवले .सर्व विद्यार्थ्यांना संचालक वासू सर व प्रिन्सीपल गुप्ता सर यांचे मार्गदर्शन लाभले.  

 या यशाबद्दल बोलताना वासू सर म्हणाले, नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व अविरत कष्टाची जोड असेल तर कोणत्याही चांगले यश संपादन करता येते. जेवढे मोठे स्वप्न असेल, तितकाच मोठा संघर्ष असेल, आणि जेवढा मोठा संघर्ष असेल,  तितकेच मोठे यश असेल असेही ते म्हणाले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक , पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.