संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘रोहित कळंत्रे याची’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
schedule12 Jan 26 person by visibility 81 categoryक्रीडा
कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित शिवलिंग कळंत्रे याची गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
रोहितच्या सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि बहारदार खेळाच्या जोरावर ही निवड झाली आहे. दिनांक ६ ते ११ जानेवारी दरम्यान गुजरात येथे होणाऱ्या या स्पर्धेत तो विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, तसेच इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, क्रीडा विभाग शिक्षक प्रा. विनायक पावटे यांनी रोहितचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

