ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
schedule20 May 25 person by visibility 442 categoryराज्य

पुणे : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर (वय ८६) यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. डॉ. नारळीकर झोपेतच निधन झाले. त्यांना कोणतीही दीर्घ आजारपण नव्हते, मात्र वयोमानानुसार प्रकृती काहीशी खालावली होती.
डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते त्यामुळे जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली
डॉ जयंत नारळीकर यांनी जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासमवेत 'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी' मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. खगोल क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांना 'पद्मभूषण' आणि पद्मविभूषण' हा सर्वोच्च सन्मान देखील मिळाला.
'चार नगरांतले माझे विश्व" या त्यांच्या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार,'यक्षाची देणगी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार तसेच अन्य विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.