SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आर.के.नगर, मोरेवाडी, पाचगावला ३ दिवसांतून एकदा पाणी देऊ : महापौर रुपाराणी निकम१११ व्या वर्षीही 'मतदाना'चा ध्यास; कोल्हापूरच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेत आजींची यशस्वी नोंदणीनृसिंहवाडीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरकोल्हापूर विमानतळावरील कर्मचाऱ्याकडून चरस तस्करी; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाईशिरोळ बंधाऱ्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करणार : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरनेदरलँड्समधील इरॅस्मस मेडिकल सेंटर सोबत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा सामंजस्य करारपालकमंत्री थेट शेताच्या बांधावर; 'एक दिवस बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत केली भात लावणी‘गोकुळ’ च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना वाढती मागणीप्रा. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात १५ जुलैला व्याख्यानजागतिक रॉक डे: संगीताच्या दुनियेतील बंडखोर आणि ऊर्जेचा महासोहळा!

जाहिरात

 

शिरोळ बंधाऱ्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करणार : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

schedule13 Jul 26 person by visibility 191 categoryराज्य

▪️५० लाखांचा निधी मंजूर, आणखी २.५० कोटींचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात 

शिरोळ : पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील संरक्षक भिंत पुराच्या प्रचंड पाण्याच्या दाबामुळे वाहून गेल्याने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन बंधाऱ्यावरील पाणी ओसरतात तातडीने भरव टाकून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे निर्देश दिले तसेच बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून उर्वरित कामांसाठी आणखी २ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. हा प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

गेल्या आठवड्यात कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. नदीतून मोठ्या प्रमाणात वाहून आलेली जलपर्णी शिरोळ बंधाऱ्याला अडकल्याने मुख्य नदीप्रवाहाला अडथळा निर्माण झाला. परिणामी पाण्याचा प्रचंड दबाव बंधाऱ्यावर आणि त्याच्या संरक्षक भिंतीवर पडू लागला. जलपर्णी हटविण्यासाठी पाटबंधारे विभागाने जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न केले; मात्र पाण्याचा वेग आणि जलपर्णीचा मोठा गुंता यामुळे ही मोहीम अर्धवट थांबवावी लागली.

याच अतिरिक्त पाण्याच्या दाबामुळे ४ जुलै रोजी बंधाऱ्याच्या उजव्या तीरावरील अधोबाजूची संरक्षक भिंत वाहून गेली होती.
या पाहणीदरम्यान आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बंधाऱ्यावरील पाणी ओसरताच तातडीने भराव टाकून धोकादायक भाग सुरक्षित करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तातडीने करण्यात येतील. शासनाच्या माध्यमातून जादा निधी उपलब्ध करून शिरोळ बंधारा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी दिली.

यावेळी शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश येसणे, शाखाधिकारी आनंद गाडे, टेक्नीकल असिस्टंट सुमित डोंगळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes