प्रा. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात १५ जुलैला व्याख्यान
schedule13 Jul 26 person by visibility 73 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. एन. डी. पाटील लोकचळवळ अध्यासनाच्या वतीने प्रा. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त "प्रा. एन. डी. पाटील आणि सामाजिक चळवळी" या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (दि. १५) सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान होईल.
ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ (सातारा) हे प्रमुख वक्ते आहेत, तर यावेळी सुप्रसिद्ध शाहिर रंगराव पाटील (कोल्हापूर) यांचे शाहीरी सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव असतील.
कार्यक्रमास डॉ. सरोज (माई) पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या व्याख्यानाला विद्यार्थी, संशोधक, शिक्षक तसेच सामाजिक चळवळींमध्ये कार्यरत असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. एन. डी. पाटील लोकचळवळ अध्यासनाचे समन्वयक प्रा. (डॉ.) रणधीर शिंदे आणि डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले आहे.