घुटना डावावर सुदर्शन कोतकर विजयी; शिरोली दु.।। येथे कुस्ती मैदान दोनशे मल्लाचा सहभाग
schedule18 May 24 person by visibility 612 categoryक्रीडा

कोल्हापूर : शिरोली दुमाला येथील शेख फरदीन बाबा उरसानिमित्त, कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्तीगीर असोसिएशन यांच्या मान्यतेने व उरूस कमिटीच्या मार्फत शुक्रवार दि.१७ मे रोजी आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकांच्या कुस्तीत शिवरामदादा तालीम पुणेच्या सुदर्शन कोतकर यांने सेना दल आमशीच्या संग्राम पाटीलला घुटना डावावरती चितपट केले.
दुसऱ्या कुस्ती सामन्यात मुंडे तालीमीच सुरज मुंडे यांनी साई कुस्ती केंद्र मुरगूडचा रोहन रंडे याला चितपट केले. तसेच तिसऱ्या कुस्तीत गंगावेश तालमीचा इम्रान मुजावर यांनी प्रदीप ठाकूर यांना आसमान दाखवले.
यावेळी कुस्ती आखाड्याचे पुजन गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील यांच्या हस्ते व कुंभी कासारी कारखान्याचे संचालक किशोर पाटील, आण्णासो पाटील, नंदकुमार पाटील, लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील,डे.सरपंच कृष्णात पाटील, अनिल सोलापुरे, एस.के.पाटील, माधव पाटील, राहुल पाटील, सुनिल पाटील, बाजीराव पाटील, भिमराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झाले.
कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल तुळशी- भोगावती खोऱ्यातील जेष्ठ पैलवान, ऑल इंडिया चॉम्पियन पै. रंगराव गोविंद कळंत्रे तसेच राष्ट्रकुल सुवर्णपदक विजयेते पै.राम सारंग (सर) यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .
विजयी झालेले मल्ल- बाबा राणगे (मोतीबाग), प्रविण पाटील (चाफोडी), पार्थ कळंत्रे (बाचणी), सुरज पालकर (राशिवडे), जयवर्धन पाटील(शिरोली दु.), आर्यन सावंत (बहिरेश्वर), राजवीर पाटील (शिरोली दु.), निशांत पाटील (पाडळी खुर्द), रोहन पाटील(शिरोली दु.), संतोष पाटील (मुळीक कुस्ती केंद्र) वेदांत पाटील (शिरोली दु.), आदर्श कांबळे (शिरोली दु.).
यावेळी प्रमुख उपस्थितिथी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, शिवाजी तोडकर, पांडुरंग पाटील, तसेच गावातील महादेव पाटील(रिशाले), एकनाथ पाटील, श्रीकांत पाटील, दीपक पाटील, के.वाय.पाटील, संभाजी पाटील, सुशांत पाटील, सरदार पाटील(नाना), प्रदीप पाटील, रणजीत पाटील, के.एन.पाटील, आर.एन.पाटील, अंकुश पाटील, शिवाजी माळी, बाबासो पाटील, रचीकेत पाटील, शिवाजी कांबळे, दिपक कांबळे, उरूस कमिटीचे सदस्य ,ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व संस्था, तरूण मंडळे व ग्रामस्थ उस्थितीत होते.पंच म्हणून बाजीराव पाटील,आप्पा निकम ,संभाजी मगदूम, सुनील फाटक, शंकर मेडसिंगे, दत्ता पाटील, शिवाजी पाटील, उत्तम पाटील यांनी काम पहिले. तर निवेदन जोतीराम वांझे यांनी केले.
