SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गांधीनगर 'कापड पेठ' की 'गुन्हेगारीचे केंद्र'? अवैध धंद्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार; आंदोलनाचा इशाराकासारी नदीच्या दोन्ही तीरावर उपसाबंदीसायकलिंग: निरोगी जीवनशैली आणि शाश्वत भविष्याचा गुरुकिल्ली!कोल्हापूर शहरातील वाहतूक समस्यांवर उपाययोजनांसाठी संयुक्त कृती आराखडा राबविणारकोल्हापूर महानगरपालिका : 27,500 मिळकतधारकांनी घेतला 6 टक्के सवलत योजनेचा लाभनालेसफाई कामांची स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांच्याकडून पाहणीमहाकाली मंदिर परिसरात चालणारा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा उद्ध्वस्तः ३८,८०० चा मुद्देमाल जप्त; पुरवठा विभागाची धडाकेबाज कारवाईकोल्हापूर : लोकशाही दिनी 86 तक्रार अर्ज दाखलबांबवडे येथे शुक्रवारी रोजगार मेळावाहिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत विविध जनजागृती उपक्रम

जाहिरात

 

गांधीनगर 'कापड पेठ' की 'गुन्हेगारीचे केंद्र'? अवैध धंद्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार; आंदोलनाचा इशारा

schedule03 Jun 26 person by visibility 150 categoryसामाजिक

गांधीनगर :  पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व्यापार पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधीनगरमध्ये सध्या क्रिकेट बेटिंग, अमली पदार्थ आणि अवैध व्यवसायांचा विळखा घट्ट झाला आहे. तरुण मुलांच्या आत्महत्या आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे संतप्त झालेल्या करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने, या अवैध धंद्यांवर त्वरित कारवाई करा, अन्यथा शिवसैनिक स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करतील, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

गांधीनगर येथील भावेश तुलसानी (वय २२) या तरूणाने नुकतीच रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. भावेश हा घरातील एकुलता एक मुलगा होता. क्रिकेट बेटिंगच्या नादात कर्जबाजारी झाल्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी जोरदार चर्चा परिसरात आहे. यापूर्वीही अनेक तरुणांनी अशाच प्रकारे कर्जबाजारी होऊन आपले आयुष्य संपवले आहे. या पार्श्वभूमीवर, सट्टेबाजांचे कंबरडे मोडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

गांधीनगर बाजारपेठेचा नावलौकिक जपण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, केवळ कापडासाठी प्रसिद्ध असलेल्या या पेठेत आता गुटखा, नशेच्या गोळ्या, गांजा,  दारू आणि क्रिकेट सट्ट्यासारखे अवैध धंदे फोफावले आहेत. यासोबतच खाजगी सावकारी, चोऱ्या आणि सशस्त्र हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. रात्रभर फिरणाऱ्या टवाळखोरांवरही पोलिसांनी कठोर पायबंद घालण्याची मागणी केली आहे.

जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, "बेटिंगमुळे तरुणांचे आयुष्य उध्वस्त होणे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने या अवैध व्यवसायांचा नायनाट करावा, अन्यथा शिवसैनिक आपल्या पद्धतीने धडक देतील." तर, तालुका प्रमुख राजू यादव यांनी गांधीनगरची ओळख 'अवैध व्यवसायांची बाजारपेठ' म्हणून होऊ लागल्याबद्दल चिंता व्यक्त करत बाजारपेठ वाचवण्यासाठी कडक कारवाईची मागणी केली.

शिष्टमंडळाच्या निवेदनावर बोलताना गांधीनगर पोलीस प्रशासनाने सांगितले की, परिसरात सध्या अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारींचा तपास केला जात आहे. जर असे धंदे करणारे लोक सापडले, तर त्यांच्यावर त्वरित कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

यावेळी शहर समन्वयक सागर साळोखे, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार, सचिन नागटिळक यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. आता या निवेदनानंतर पोलीस प्रशासन नक्की काय पावले उचलते, याकडे गांधीनगरकरांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes