SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : लोकशाही दिनी 86 तक्रार अर्ज दाखलबांबवडे येथे शुक्रवारी रोजगार मेळावाहिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत विविध जनजागृती उपक्रमकोरे अभियांत्रिकी मध्ये पीबीएल दिन उत्साहात संपन्नसह्याद्री ते हिमालय: ‘कोल्हापूर हायकर्स’ची पवित्र जल संकलन मोहीम संपन्न'द लिजंड' राज कपूर यांच्या स्मृतींना उजाळा; कोल्हापुरातील स्मारकाच्या सुशोभीकरणाची मागणीजागतिक पाळीव प्राणी दिवस: प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव"जयसिंगपूरात साकारणारी भीमसृष्टी प्रेरणादायी ठरेल"जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहता कामा नये : आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापूर महानगरपालिका : लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार १३ वारसांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते नियुक्तीपत्रे

जाहिरात

 

हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत विविध जनजागृती उपक्रम

schedule02 Jun 26 person by visibility 115 categoryआरोग्य

कोल्हापूर: राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘हिवताप प्रतिबंध महिना- जून 2026’ साजरा करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हिवताप (मलेरिया), डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका, जपानी मेंदूज्वर तसेच इतर कीटकजन्य आजारांविषयी जनतेमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवा हिवताप विभागाचे  सहाय्यक संचालक डॉ. संजय रणवीर यांनी दिली.

  हिवताप प्रतिबंध महिन्यादरम्यान ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शैक्षणिक संस्था, महिला बचत गट, युवक मंडळे व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रभातफेरी, जनजागृती रॅली, ग्रामसभा, आरोग्य शिक्षण कार्यक्रम, घरभेटी, प्रदर्शन व व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.

   या अभियानामध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका व फायलॅरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांची कारणे, लक्षणे, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांबाबतही जनजागृती करण्यात येणार आहे.

  डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, आठवड्यातून एक दिवस "कोरडा दिवस" पाळणे, मच्छरदाणीचा वापर करणे, घर व परिसरातील पाणीसाठ्यांची नियमित तपासणी करणे तसेच ताप आल्यास त्वरित आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून घेण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

   नागरिकांनी ताप, थंडी वाजणे, अंगदुखी, डोकेदुखी किंवा इतर संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes