SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर राज्यात प्रथमकोल्हापूर महानगरपालिका : सेवानिवृत्त ७ कर्मचाऱ्यांचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन प्रा.फंडाच्या रक्कमेचा धनादेश प्रदानकोल्हापुरात रस्त्यावर सोडलेल्या जनावरांच्या मालकावर दंडात्मक कारवाईलग्नात आंदण म्हणून पुस्तकाच्या कपाटाची प्रथा सुरु होईल, त्याचवेळी समाज प्रगतीपथावर जाईल : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार सामाजिक कार्याबद्दल ममता मगदूम यांचा सत्कार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचे सभासद प्रशिक्षणासाठी रवानाडीकेटीई टेक्स्टाईलच्या २१ विद्यार्थ्यांची वेलस्पनमध्ये निवडअसर्जन येथील स्मशानभूमीसाठी मूलभूत सुविधा देण्याची मागणी; प्रशासनाकडे निवेदनशक्तिपीठ महामार्गाविरोधात उद्या पुणे-बंगळुरू महामार्ग रोको आंदोलन"सतेज मॅथ्स" मुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल : देवश्री पाटील; डी. वाय. पी. साळोखेनगर येथे ‘स्कॉलर’ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका : नगरोत्थानमधील रस्त्यांच्या कामातील त्र्युटींमुळे अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता व जल अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस

schedule20 May 24 person by visibility 365 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियाना (राज्यस्तर) अंतर्गत 100 कोटींच्या निधीतून शहरातील 16 मुख्य रस्ते करण्यात येत आहेत. यातील मिरजकर तिकटी ते नंगीवली चौक या रस्तेवर डांबरीकरणानंतर पुन्हा खुदाई केलेच्या तक्रारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने या रस्त्यांच्या व अन्य कामाची आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दुपारी पाहणी केली. 

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उप-शहर अभियंता सतिश फप्पे, आर.के.पाटील, महादेव फुलारी उपस्थित होते. या ठिकाणी आढळून आलेल्या कामातील त्रुटी या संबंधीत विभागामध्ये समन्वय नसलेचे प्रशासकांच्या निदर्शनास आले. यामुळे प्रशासकांनी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत रस्त्यांच्या कामाची वर्क ऑर्डर सोलापूर येथील ठेकेदार मे.एवरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर्स अँड डेव्हलपर्स यांच्या नांवे मंजूर आहे. या मंजूर 16 रस्त्यांपैकी 5 रस्तेची कामे ठेकेदारामार्फत सुरु आहेत. यामधील कोळेकर तिकटी ते नंगीवली चौक, निर्मिती कॉर्नर ते कळंबा रोड, खरी कॉर्नर ते उभा मारूती चौक, माऊली चौक ते हुतात्मा चौक येथे सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची व इतर कामाची प्रशासकांनी आज पाहणी केली. यावेळी या ठिकाणी ड्रेनेजचे मेनहोल, युटीलीटी व इतर बाबी डांबरीकर करताना समन्वया अभावी डांबरीकरणाच्या खाली गेल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक नागरीकांशी प्रशासकांनी संवाद साधला. त्यांच्या कामाबाबतीत काही सूचना अथवा तक्रारी त्यांनी एैकूण घेतल्या. यानंतर अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता व ठेकेदार यांना सर्व कामे दर्जेदार, विहित मुदतीत व टेंडरमधील स्पेसिफिकेशन प्रमाणे पूर्ण करुन घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच रस्तेवर अथवा गटारीमध्ये पाणी तुंबून कोणाच्याही घरात जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या.

  या 5 रस्तेमध्ये निर्मिती कॉर्नर ते कळंबा रोड या 598 मी. लांबीच्या रस्तेचे रुंदीकरणासह खडीकरण व डांबरीकरण करणेचे काम पूर्ण केलेले आहे. कोळेकर तिकटी ते नंगीवली चौक या 400 मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. खरी कॉर्नर ते उभा मारूती चौक या रस्तेचे खडीकरण पूर्ण झालेले आहे. माऊली चौक ते हुतात्मा चौक ते विश्वजित हॉटेल लांबी 1500 मी. या रस्तेचे युटीलिटी शिफटींग व खडीकरणाचे काम सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes