SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुलींच्या वसतीगृहात सामाजिक सप्ताह उत्साहात साजराकोल्हापूर शहर-जिल्हा NSUI आयोजित सतेज सेवा सप्ताहाचा समारोह .जालियनवाला बाग हत्याकांड - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक काळा अध्यायआमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावविदर्भ आता कोळशात स्वयंपूर्ण; कोराडी वीज केंद्रात छत्तीसगडमधून पहिली मालगाडी दाखलअमेरिका आणि इराणमधील २१ तासांची चर्चा निष्फळ; पश्चिम आशियातील शांतता प्रयत्नांना मोठा धक्काबारमाही ऋतू हिरवा; भावभावनांचा सुरेल महासागर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजलीनियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करण्याची दक्षता घ्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकॉपीमुक्त अभियान विद्यार्थ्यांच्या सहभागातूनच यशस्वी होईल: दीपक अडगळेशिवाजी विद्यापीठाची स्वप्नाली मगदूम ‘यंग स्कॉलर’ स्पर्धेत देशात प्रथम; अमेरिकेतील परिषदेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

जाहिरात

 

मुलींच्या वसतीगृहात सामाजिक सप्ताह उत्साहात साजरा

schedule13 Apr 26 person by visibility 84 categoryसामाजिक

कोल्हापूर :  गारगोटी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहात महात्मा ज्योतिराव फुले यांची 200 वी जयंती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी गृहपाल सविता कांबळे व तालुका समन्वयक सुरेखा डवर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. 

 प्रमुख व्याख्यात्या सुरेखा डवर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या विषयी बोलताना सांगितले की , फुले यांनी तत्कालीन समाजात समता,बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करण्यावर भर दिला तसेच त्यांचे विचार हे मानवतेचा व प्रगतीचा मार्ग दाखवणारे असल्याचे म्हणाल्या .

 यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनी आरती कांबळे हिने आपले समयोचित विचार व्यक्त केले . या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांचे मार्गदर्शन लाभले . याप्रसंगी निवासी शाळा अधिकारी अक्षय कुरणे,समाज कल्याण निरीक्षक अतुल पवार,आर.एम.देसाई यांच्यासह वसतिगृहातील कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes