SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावविदर्भ आता कोळशात स्वयंपूर्ण; कोराडी वीज केंद्रात छत्तीसगडमधून पहिली मालगाडी दाखलअमेरिका आणि इराणमधील २१ तासांची चर्चा निष्फळ; पश्चिम आशियातील शांतता प्रयत्नांना मोठा धक्काबारमाही ऋतू हिरवा; भावभावनांचा सुरेल महासागर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजलीनियोजित वेळेत गुणवत्तापूर्ण कामे करण्याची दक्षता घ्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकॉपीमुक्त अभियान विद्यार्थ्यांच्या सहभागातूनच यशस्वी होईल: दीपक अडगळेशिवाजी विद्यापीठाची स्वप्नाली मगदूम ‘यंग स्कॉलर’ स्पर्धेत देशात प्रथम; अमेरिकेतील परिषदेत करणार भारताचे प्रतिनिधित्वराजर्षी शाहू विकास आघाडीच्या यशाबद्दल लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा उत्साहात 'स्वप्नांच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच स्वप्न बना'; कोल्हापुरात कानिफनाथ महाराजांचे प्रेरणादायी विचारस्वरसम्राज्ञी आशा भोसले काळाच्या पडद्याआड; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जाहिरात

 

आमदार सतेज पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

schedule12 Apr 26 person by visibility 195 categoryसामाजिक

यशवंत निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या गर्दी; विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रम साजरे

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विविध संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून विधायक उपक्रम राबवत दातृत्वाचा जागर केला. आमदार पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार यावेळी शुभेच्छा लाखो वह्या संकलित झाल्या असून लवकरच गरजू विद्यार्थ्यांना त्या वितरीत केल्या जाणार आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतील मोठ्या यशामुळे यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला कार्यकर्त्यांमध्ये  अधिकच उत्साह होता.  कोल्हापूर शहरासह दक्षिण, राधानगरी, करवीर, चंदगड, हातकणंगले, शिरोळ, गगनबावडा, भुदरगड, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज, आजरा,  चंदगड परिसरात समाजपयोगी उपक्रम व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. 

आमदार सतेज पाटील यांनी  पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील आणि सौ. शांतादेवी डी. पाटील यांचे शुभाशीर्वाद घेतले.   डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, मेघराज काकडे, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, करण काकडे,  तेजस पाटील, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, पूजा पाटील, वृषाली पाटील, स्नेहा पाटील, देवश्री पाटील, अर्जुन व आर्यमन पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देत वाढदिवस उत्साहात साजरा केला.

‘यशवंत निवास' समोर उभारलेल्या भव्य मंडपामध्ये दुपारी ३ वाजल्यापासून  आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी  विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून राजकीय, सहकार, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा, आरोग्य सामाजिकसह विविध क्षेत्रातील राज्यभरातील मान्यवर, कार्यकर्ते यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली.

राष्ट्रवादीचे  प्रफुल पटेल, अखिल भारतीय काँग्रेसचे बी. संदीप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम बी पाटील,खासदार रवींद्र चव्हाण, गणेश हुक्केरी, माजी खासदार रजनीताई पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार सत्यजीत देशमुख, राजेश पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, नसीम खान, सुमित कदम निवेदिता माने, वीरकुमार पाटील, यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या.

खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार जयंत आसगावकर, कॉग्रेसचे निरीक्षक जयशंकर पाठक, माजी आमदार के. पी. पाटील सत्यजित पाटील, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार राजीव आवळे, सुजित मिणचेकर, शिवसेना उपनेते संजय पवार,  सह संपर्कप्रमुख विजय देवणे, आर के पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सुनिल शिंत्रे, अण्णासाहेब चकोते, केडीसीचे संचालक भैया माने, युवराज बापू पाटील, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, विश्वास पाटील, बाबासो चौगले ,अजित नरके, कर्णसिंह गायकवाड, बयाजी शेळके, अमर पाटील, किसन चौगले, चेतन नरके, नंदकुमार ढेगे, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिका विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, करवीर तालुकाध्यक्ष रामकृष्ण पाटील,  जिल्हापरिषद गटनेते एकनाथ पाटील व सदस्य, गगनबावडा पंचायत समिती सभापती छाया देसाई, राधानगरीचे सभापती आर. वाय.पाटील, दौलत देसाई, उदय नारकर, अभिजीत तायशेटे, राहुल देसाई, राजू दिर्डोले, मानसिंग बोंद्रे, उदयानी साळुंखे, डॉ. के. एन. पाटील, विशाल देवकुळे, शशिकांत खोत, मंजित माने यांच्यासह काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध नगरपालिकेचे नगरसेवक विविध गावचे सरपंच, काँग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी, विविध तरुण मंडळे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.


🟣 विविध सामाजिक उपक्रम
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने 'देवूया गरजूना साथ, वाढदिनी मदतीचा हात' या उपक्रमांतर्गत कार्यकर्ते व विविध संस्थांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 
नगरसेविका स्वालिया बागवान यांच्या वतीने कलिंगड वाटप करण्यात आले. रामकृष्ण (बंडू) जाधव यांच्यावतीने  कसबा बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याशिवाय विविध ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, रूग्णांना फळे वाटप, फुटबॉल, क्रिकेट, बैलगाडी स्पर्धा आदी उपक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते. 


 🟣 लाखो वह्या संकलित
 गेली १६ वर्षे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ ऐवजी वह्यांच्या स्वरूपात  शुभेच्छा स्वीकारण्याचा उपक्रम आमदार सतेज पाटील यांच्याकडून राबवला जातो. लिम्का बुक मध्ये नोंद झालेल्या या उपक्रमाला यावर्षीही  प्रचंड प्रतिसाद लाभला.
कोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस नगरसेवक आणि गगनबावडा तालुका काँग्रेस यांच्याकडून प्रत्येकी 54 हजार वह्या भेट देण्यात आल्या. याशिवाय विविध संघटना कार्यकर्ते यांच्याकडून लाखो वह्या भेट म्हणून संकलित झाल्या. या उपक्रमाअंतर्गत 2007 ते 2025 पर्यंत 70 लाख 61 हजार 672 वह्या संकलित झाल्या होत्या. या वह्या 15 लाख 69 हजार 165 विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत.

🟣 गर्दीचा महापूर
सर्वसामान्य जनतेचे लाडके नेते आमदार सतेज पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी 'यशवंत निवास' समोर अक्षरशः गर्दीचा महापूर उसळला होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच सामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शुभेच्छा देण्यासाठी दुपारी ३ वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes