SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईरेड झोन नियमावलीच्या बंधनात अडकलेले डी.पी. रोड पूर्ण करण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची विधिमंडळात मागणीस्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये अभियांत्रिकी प्रवेश मार्गदर्शन सत्राला उदंड प्रतिसादनसरापूर चिमुरडी बलात्कार-हत्या प्रकरण: नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; न्यायालयाने सुनावला 'मृत्यूदंड'वटपौर्णिमा: निसर्ग आणि नात्यांचा पवित्र संगमआंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन: पृथ्वीच्या फुफ्फुसांचे जतन​"ऊस उत्पादकांच्या न्यायासाठी 'अन्नत्याग' यशस्वी; चुयेकर यांच्या संघर्षाची मुख्यमंत्र्यांकडून दखल"महाराष्ट्रात दंत आरोग्य व दंत पर्यटन क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याची क्षमतापल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत 46170 बालकांचे लसीकरणन्याय्य पदोन्नतीसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शिक्षक

जाहिरात

 

३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई

schedule29 Jun 26 person by visibility 104 categoryराज्य

मुंबई : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामेही रोखण्यात येणार आहेत.

एचएसआरपी नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल, तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओमधील सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही.

दरम्यान, ३० जूनपर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.

राज्यात एचएसआरपी बसविण्याच्या कामासाठी तीन झोन निश्चित करण्यात आले असून, झोन १ साठी रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, झोन २ साठी रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि झोन ३ साठी एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाने एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृत दरही निश्चित केले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये, तर हलकी मोटार वाहने आणि मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी वगळून, फिटमेंट शुल्कासह) आकारण्यात येणार आहेत.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये पोलीस आणि परिवहन विभाग हे संयुक्त किंवा स्वतंत्रपणे ही कारवाई करणार आहेत. तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर ३० जूनपूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes