+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात : समीर देशपांडे; करवीर नगर वाचन मंदिरात वाचन प्रेरणा दिन adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
schedule14 May 24 person by visibility 178 categoryशैक्षणिक
कोल्हापूरः शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागमधील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपले यश सिध्द केले आहे. अमेय सबनीस आणि निकिता पाटील यांनी पुन्हा एकदा नॅनोसायन्स अधिविभागाचे नाव लौकीक वाढवला आहे. 

 अमेय माधव सबनीस (रा. गडहिंग्लज) याची निवड भारत सरकारच्या गृह खात्यात अधिकारी म्हणून झाली आहे. अमेय, नॅनोसायन्सच्या २०२० च्या बाँचचा गुणवान विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे अमेयचा बी. एस. सी. एम. एससी नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा ५ वर्षाचा इंटीग्रेटेड कोर्स कोरोना काळात पूर्ण झाली आहे. कोरोना काळात ध्येयासक्ती आणि अभ्यासावरील निष्ठा कायम ठेऊन त्याने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करुन गृह खात्यात नोकरी निवडली. 

 निकिता जगन्नाथ पाटील (रा. सांगली) हिने सुद्धा बी. एस. सी. एम. एससी नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा कोर्स, पहिल्या क्रमांकाने कोरोना काळात पूर्ण केली आहे. त्यानंतर तिने भारतातील नामवंत कंपनी फ्लोरोसेंस परफ्युममध्ये रीसर्च आणि डेव्हलोपमेंटमध्ये अनेक नॅनोप्रॉडक्ट बनवली आहेत. निकिता, सथ्या अमृता युनिव्हर्सिटी, कोईम्बतूर येथे बायो सेन्सर या विषयात पी. एच डी पूर्ण करत आहे. विद्यार्थ्यांच्या मते, ५ वर्षाचा नॅनोसायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी हा इंटीग्रेटेड कोर्स शिकत असताना बहुविद्याशाखीय (Multidisciplinary) अभ्यासक्रमाचा फायदा स्पर्धा परीक्षा व संशोधन करताना झाला. नॅनोसायन्समधील विद्यार्थ्यांची अशी विविध क्षेत्रातील उपलब्धी पाहून कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांचा आनंद द्विगुणित झाला.

 तसेच नॅनोसायन्समधील विद्यार्थ्यांनी भविष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. नॅनोसायन्स अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. के. के. शर्मा तसेच सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.