SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजनशिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

जाहिरात

 

ऊसतोड मुजरांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात : जिल्हाधिकारी अमोल येडगे

schedule03 Jan 26 person by visibility 213 categoryराज्य

कोल्हापूर : ऊसतोड मजुरांना  साखर कारखान्यांकडून जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळावा तसेच त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी कार्यरत रहावे.तथापि यामध्ये आचारसंहितेची अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले .

   गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

 ते म्हणाले,ऊसतोड कामगारांच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात सुमोटो रिट याचिका दाखल असून या रिट याचिकेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी त्यांच्याकडे असणारी पूर्ण माहिती द्यावी.जिल्ह्यात एकूण 822 विद्यार्थी साखर शाळेपासून वंचित आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत समाविष्ट करावे.एक ही मुलगा शाळेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता कारखानदारांनी व शिक्षण विभागाने घ्यावी . त्याचबरोबर बैलांचे टॅगिंग करावे.या योजनेच्या अनुषंगाने त्रुटींची पूर्तता पूर्ण करून पुन्हा प्रस्ताव पाठवावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या.

 सन 2025 - 26 या वर्षामध्ये ऊसतोड कामगार सानुग्रह अनुदान योजनेसाठी 20 प्रस्ताव प्राप्त झाले असून अनुदानासाठी 8 प्रस्ताव पात्र असल्याची माहिती गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी दिली

 .यावेळी महिला बाल विकास,शिक्षण, कामगार,परिवहन,पुरवठा,साखर,पोलीस विभागाचे त्याचबरोबर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes