SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वारसा जतन : काळाची गरज आणि आपली जबाबदारीमोदी सरकारला मोठा धक्का: लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक फेटाळले!मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ता, हद्दी व सीमा बाबत आराखडा निश्चित करा : आमदार अमल महाडिकशासन राज्यभरात सुमारे ३ हजार ‘मार्गस्थ निवारे’ उभारणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईककोल्हापूर : बालिंगा जल उपसा केंद्रावरुन होणारा पाणी पुरवठा सोमवारी बंदशिवाजी विद्यापीठात पांढऱ्या पोटाच्या समुद्री गरूडाचे दर्शन तीन महिन्यांपासून जोडीचे वास्तव्य; समृद्ध व सुरक्षित जैवविविधतेवर शिक्कामोर्तबकुक्कुट पालन प्रशिक्षणार्थींनी संपर्क साधण्याचे आवाहनकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी तक्रारी दाखल करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी10 खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित; कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा मुबलक साठाजयसिंगपूर येथे नूतन बस स्थानकाच्या इमारतीचा लोकार्पण : एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व सुलभ प्रसाधनगृह मोफत करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जाहिरात

 

‘गोकुळ’ परिवारातील सदस्यांची जि.प. निवड अभिमानास्पद : नविद मुश्रीफ; गोकुळ मार्फत मान्यवरांचा सत्कार

schedule20 Feb 26 person by visibility 488 categoryउद्योग

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्यावतीने कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य पदी निवड झाल्याबदल संघाचे संचालक अमरसिंह पाटील, अभिजित तायशेटे तसेच सुयशा अंबरिषसिंह घाटगे (व्हनाळी), अमृता अरुण डोंगळे (घोटवडे), शिवाजी मुरलीधर जाधव (हुपरी), अनिरुद्ध केदारी रेडेकर (पेद्रेवाडी) यांचा गोकुळच्या वतीने संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. यावेळी संघाचे संचालक व अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी बोलताना संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्‍हणाले, गोकुळ ही संस्था नसून एक सशक्त कुटुंब आहे. आपल्या परिवारातील सदस्य विविध क्षेत्रांत यश संपादन करत आहेत, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हे यश केवळ व्यक्तीचे नसून संपूर्ण गोकुळ परिवाराच्या संस्कारांचे आणि सहकार्याचे फलित आहे. ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना ग्रामीण भागातील विकास, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष द्यावे. सहकारातून मिळालेली पारदर्शकता, जबाबदारी आणि जनसामान्यांप्रती संवेदनशीलता हीच मूल्ये सार्वजनिक कार्यातही जपली गेली पाहिजेत.

  यावेळी सत्कारास उत्तर देताना अमृता डोंगळे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले, “गोकुळ परिवाराने दिलेला सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. संघाने जपलेली सहकाराची परंपरा आणि समाजाशी असलेली नाळ आम्हाला पुढील कार्यकाळात मार्गदर्शक ठरेल. सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करू.”

  यावेळी सर्व सत्कारमूर्तींना पुढील वाचालीसाठी गोकुळ परिवारामार्फत शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच गोकुळ मधील कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्त निमित्य सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes