SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने आणि कायदेशीर तोडगा काढावा: खासदार शाहू छत्रपती महाराजगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीमबालशिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी शासनाचा पुढाकार : आमदार यड्रावकरअवकाळीग्रस्त ३६८ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३० लाख जमा कोल्हापूर मपालिकेच्यावतीने भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती साजरीमहिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'युवावर्स' उत्साहातनकारात्मकतेला रामराम; सकारात्मक विचारांची जादू!जवाहर कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवन गौरव पुरस्कारकोल्हापूर शहरातील डी.पी. रस्ते व आरक्षणे TDR माध्यमातून विकसित करण्याबाबत बैठक

जाहिरात

 

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने आणि कायदेशीर तोडगा काढावा: खासदार शाहू छत्रपती महाराज

schedule13 Sep 26 person by visibility 49 categoryराज्य

कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कोल्हापूर जिल्हातील मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी जाहीर केले आहे. मराठा समाज गेली अनेक वर्षे आरक्षणासह विविध मागण्या आणि सोयी-सुविधांसाठी लोकशाही मार्गाने लढा देत असल्याचे त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

खासदार शाहू छत्रपती महाराजांनी नमूद केले की, या आंदोलनाच्या पुढील टप्प्यात समाजाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर शांततामय मूक मोर्चे काढले तसेच विविध तालुके आणि जिल्ह्यांमध्ये ठिय्या आंदोलने केली. मनोज जरांगे पाटील यांनी विविध ठिकाणी प्रदीर्घ उपोषणे केली, तेव्हा शासनाने आश्वासने देऊन आंदोलने थांबवली. मात्र, ही आश्वासने पूर्णतः अंमलात आणण्यात शासन आणि शासकीय यंत्रणा अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरलेली नाही, ज्यामुळेच जरांगे पाटील यांना पुन्हा आमरण उपोषण सुरू करावे लागले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाला यापूर्वीही सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला होता आणि आता होणाऱ्या आंदोलनालाही कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे, असे खासदार शाहू छत्रपती महाराजांनी स्पष्ट केले.


⚪️ "शासनाने पुढाकार घेऊन मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, त्या कायदेशीर कसोटीवर टिकतील अशा पद्धतीने तातडीने आणि प्रभावीपणे पूर्ण कराव्यात, अशी आमची अपेक्षा आहे." : खासदार शाहू छत्रपती महाराज

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes