बेळगांव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनुरकर, शर्वरी कबनूरकर, अंशुमन शेवडे यांचे यश
schedule05 Jan 26 person by visibility 196 categoryक्रीडा
कोल्हापूर : बेळगाव, महावीर भवन येथे 3, 4 जानेवारी रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर याने ९ व्या फेरीत ७ गुण मिळवून पहिला क्रमांक घेत १३,००० रुपये आणि २३फिडे गुणांची कमाई केली. शर्वरी कमनूरकर हीने ६.५ गुण मिळवून ३ रा क्रमांक मिळाला. तीला ५,००० रुपये पारितोषिक आणि २० फिडेल रेटीग कमाई केली. अशुमन निखिल शेवडे ६ गुण मिळवून अंडर १६गटात ३००० रुपयेचे पारितोषिक मिळाले आणि आपल्या फिडे १२० गुण कमाई केली.
रोटरी चषक बुद्धिबळ स्पर्धा 2026 रोटरी क्लब. आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने तर्फे महावीर भवनात खुल्या वर्षांखालील मुलांसाठी फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण ५००००० रुपयाची पारितोषिके होती. देशातील ३५६खेळाडूनी भाग घेतला त्या मध्ये १८४ फिडे मानांकित खेळाडू होते.
ऋषिकेश शर्वरी अंशुमन हे अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतात. ऋषिकेश हा स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

