पुणे : पुणे -बेंगळुरु महामार्गावर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे चार चाकीने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये पोलीसासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन पवार यांचा अपघातात मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला.
महामार्गावरील अपघातात मृत पोलीसासह त्यांची बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाले आहेत. मृतांतील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. मनीषा आप्पासाहेब जाधव आणि नितीन बापूसाहेब पोवार आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव अशी मृतांची नावे आहेत. एक जण गंभीर जखमी आहे.