SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अनधिकृत कृषी ड्रोन विरोधात राज्यस्तरीय विशेष मोहिमेची मागणी; महाराष्ट्र राज्य ॲग्री ड्रोन ओनर्स असोसिएशनचे कोल्हापुरातून शासनाला साकडेएसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार; मंत्री प्रताप सरनाईककोल्हापुरात गुरुवारी मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी ९ वाजता ईदची नमाज; शहरातील इतर मस्जिदचे वेळपत्रक जाहीरनॅशनल सॉरी डे: चुकांची कबुली आणि सलोख्याचे पाऊलकिणी-हंदळेवाडीत शेततळ्यात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू; आरोग्य सुविधेअभावी ग्रामस्थांचा संताप27 पर्यंत दूधगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील उपसांबदी'गोकुळ' निवडणूक रणधुमाळीला सुरुवात; मतदार यादी निश्चितीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीरहलगर्जीपणा खपवून घेणार नाही; घरफाळा वसुलीसाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे 'ॲक्शन मोड'मध्ये आदेशकोल्हापूर महापालिका वर्कशॉपमधील स्क्रॅपचा तातडीने लिलाव करा; सभापती विशाल शिराळे यांचे अधिकार्‍यांना कडक निर्देशवस्तूंच्या मनमानी एमआरपी आणि वाढत्या किमतीविरोधात ग्राहक पंचायतीचे कोल्हापुरात आंदोलन; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जाहिरात

 

कोल्हापुरात गुरुवारी मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर सकाळी ९ वाजता ईदची नमाज; शहरातील इतर मस्जिदचे वेळपत्रक जाहीर

schedule26 May 26 person by visibility 158 categoryसामाजिक

कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित मुस्लिम बोर्डिंगच्या ऐतिहासिक पटांगणावर दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद-उल-अजहा (बकर-ईद) ची मुख्य नमाज पारंपरिक पद्धतीने पठण केली जाणार आहे. येत्या गुरुवारी, म्हणजेच २८ मे २०२६ रोजी ठीक सकाळी ९.०० वाजता या विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पहिल्या जमातीचे मुख्य नमाज पठण मुफ्ती इरशाद कुन्नुरे हे करणार आहेत. या संदर्भातील माहिती संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मुस्लिम बोर्डिंग सोबतच कोल्हापूर शहरातील इतर विविध भागांतील मस्जिदमध्येही बांधवांच्या सुविधेसाठी नमाज पठणाची वेळ निश्चित करण्यात आली असून त्याचे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे:
◼️सकाळी ६.२० ते ७.०० वाजता:
 * ६.२० वाजता: कसाब मस्जिद.
 * ६.३० वाजता: नंगीवली मस्जिद.
 * ६.४५ वाजता: लक्षतीर्थ मस्जिद, सरनाईक वसाहत अबुबकर मस्जिद.
 * ७.०० वाजता: सरनाईक वसाहत बडी मस्जिद.
◼️सकाळी ७.१५ ते ७.३० वाजता:
 * ७.१५ वाजता: लक्षतीर्थ मस्जिद.
 * ७.३० वाजता: निहाल पैलवान मस्जिद (मर्कज), मणेर मस्जिद, राजेबागस्वार मस्जिद, बाराइमाम मस्जिद, सदरबझार मस्जिद, कदमवाडी मस्जिद, जमादार कॉलनी मस्जिद, बडी मस्जिद, युनिकपार्क मस्जिद आणि मुडशिंगी मस्जिद.
◼️सकाळी ७.४५ ते ८.०० वाजता:
 * ७.४५ वाजता: न्यु शाहूपुरी बेकर गल्ली मस्जिद, जामा मस्जिद (स्टेशनसमोर), मदिना मस्जिद.

​◼️८.०० वाजता: कब्रस्तान मस्जिद, बाबुजमाल मस्जिद, अकबर मोहल्ला मस्जिद, गवंडी मोहल्ला मस्जिद, विकमनगर मस्जिद, प्रगति कॉलनी मस्जिद, लाईनबाजार मस्जिद, कसबाबावडा मस्जिद, सरदार कॉलनी मस्जिद, उत्तरेश्वरपेठ मस्जिद, फुलेवाडी मस्जिद, कोल्हापूर शहर इदगाह मैदान पाण्याचा खजिना आणि सिरत मोहल्ला मस्जिद.

◼️सकाळी ८.१५ ते ९.०० वाजता:
 * ८.१५ वाजता: बुरहानपूर masjid, केसापूर मस्जिद, टाकाळा मस्जिद.
 * ८.३० वाजता: घुडणपीर मस्जिद, शहाकुली रंकाळा स्टँड मस्जिद, नंगीवली मस्जिद.
 * ९.०० वाजता: मुस्लिम बोर्डिंग मस्जिद.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes