अतिग्रे : जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात ए आय चे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) महत्त्व वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन बी एन वाय मिलोन इंडियाचे माजी कार्यकारी संचालक डॉ.अनिश कुमार यांनी केले. ते संजय घोडावत विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत बोलत होते.
यावेळी माजी टीव्हीएस इन्फ्रास्ट्रक्चर चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभ्रता घोषाल यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना बँकिंग आणि अर्थक्षेत्रातील नोकऱ्यां मधील नवीन संधी विषयी सखोल माहिती दिली. तसेच या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहावर भाष्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभागाच्या अधिष्ठाता डॉ योगेश्वरी गिरी यांनी केले. त्या म्हणाल्या की विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कार्यशाळा व तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते.
या कार्यक्रमासाठी डॉ.विश्वास पेंडसे, डॉ. रेवती देशपांडे यांनी कष्ट घेतले. तर विश्वस्त विनायक भोसले,कुलगुरू प्रो.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांनी मार्गदर्शन केले.