+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्रातील पहिला ‘गोकुळ’ चा हर्बल पशुपूरक प्रकल्प; जनावरांच्या उपचारासाठी गोकुळची आयुर्वेदिक उत्पादने : अरुण डोंगळे adjustकोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करुन सतर्क रहा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रशासकीय यंत्रणेला सूचना adjustकोल्हापूर जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली; वाहतुकीस पर्यायी मार्गाचा अवलंब; राधानगरी धरणातून 1450 क्युसेक विसर्ग adjustकोणत्याही संस्थेचा चतुर्थश्रेणी कर्मचारी हा ब्रँन्ड अॅम्बॅसॅडर : मेधा जेरे adjustडीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची नामांकित ‘भारत फोर्ज ‘ कंपनीमध्ये निवड adjustशिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे adjustसंजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना डीबीटीसाठी बँक खाते व आधार लिंक करा : उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी adjustगजापूर मधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य : पालकमंत्री हसन मुश्रीफ adjustविशाळगड प्रकरणः कोल्हापुरात एमआयएमची पावसात निदर्शने; हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी adjustविशाळगड येथील घटनेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा
1000867055
1000866789
schedule21 Jun 24 person by visibility 220 categoryउद्योग
कोल्हापूर : महाराष्ट्र शासन, कृषी विभागाकडून इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेटर, वनस्पतीशास्त्र अधिविभागास प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) या योजनेंतर्गत क्षमता बांधणी व प्रशिक्षण या घटकांतर्गत “जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्था” म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. या जिल्हास्तरीय प्रशिक्षण संस्थेतर्फत दि. 19 ते 21 जून या कालावधीमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगातील नोंदणीकृत वैयक्तिक 20 लाभार्थी यांना प्रशिक्षण वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या निलांबरी ऑडीटारीयम हॉलमध्ये देण्यात आले.

 या प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभास अमोल येडगे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची प्रमुख उपस्थिती तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. डी. टी. शिर्के होते.

 त्याचबरोबर बसवराज बिराजदार, विभागीय कृषि सह संचालक, कोल्हापूर, अजय कुलकर्णी, जिल्हा कृषि अधिकारी, कोल्हापूर, आनंदराव जाधव, जिल्हा नोडल अधिकारी (PMFME) तथा कृषि उपसंचालक, कोल्हापूर, अरुण भिंगारदिवे, उपविभागीय कृषि अधिकारी, करवीर, गणेश गोडसे, जिल्हा अग्रणी प्रबंधक, अग्रणी बँक तथा बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर व बंडा कुंभार, तालुका कृषि अधिकारी, करवीर, प्रा. डॉ. आर. व्ही, गुरव, अधिविभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र अधिविभाग, डॉ. एम. एस. निंबाळकर, समन्वयक, इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, प्रा.डॉ. (श्रीमती) जे. पी. जाधव, अधिविभागप्रमुख, जैवतंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व कृषी विभागातील अधिकारी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. 

 या प्रशिक्षणाच्या उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी मान्यवराच्या हस्ते वृक्षास पाणी देवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. उद्घाटन समारंभाच्या सुरुवातीस जिल्हाधीकारी अमोल येडगे, यांचे स्वागत व सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरुसो यांचे स्वागत व सत्कार विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव यांचे हस्ते करण्यात आला. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व कृषि विभागातील अधिकारी व मान्यवर यांचे स्वागत वनस्पतीशास्त्र अधिविभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव यांचे हस्ते करण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवी शिरोळकर,डी.आर.पी. यांनी केले. 

 प्रशिक्षण उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी नोंदणीकृत सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेसंबंधी मार्गदर्शन अमोल येडगे यांनी केले. विभागप्रमुख प्रा.डॉ.आर. व्ही. गुरव यांनी वनस्पतीशास्त्र अधिविभागाची संक्षिप्त माहिती, विभागामध्ये सुरु असलेल्या विविध संशोधन, संशोधनाभिमूख कार्यक्रम, इ. बाबतची माहिती दिली. प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरुसो, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये सुरु असलेल्या संशोधन तसेच शेतकरी यांचेसाठी आवश्यक असलेल्या विविध घटकांची माहिती देवून त्याचा लाभ घेण्याविषयी व लघूउद्योग, अन्न प्रक्रिया, गुळ व इतर अन्न प्रक्रियेशी निगडीत असणाऱ्या बाबींसंदर्भात मार्गदर्शन करुन सर्व लाभार्थ्यांना प्रशिक्षणासाठी व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जैवतंत्रज्ञान अधिविभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. (श्रीमती) जे. पी. जाधव यांनी अधिविभागामध्ये गुळावर सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती दिली व सदर प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. 

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमीत्त महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या वतीने “श्रीअन्न आणि पोषण” या पुस्तकाचे प्रकाशन अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर, प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, मा. श्री. बसवराज बिराजदार, विभागीय कृषि सह संचालक, कोल्हापूर, अजय कुलकर्णी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर, प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र अधिविभाग, प्रा. डॉ. जे. पी. जाधव, विभागप्रमुख, जैवतंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व डॉ. एम. एस. निंबाळकर, समन्वयक, इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे हस्ते झाले. इन्क्युबेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटरचे समनव्यक डॉ. एम. एस. निंबाळकर यांनी आभार मानले.