SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादनकोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन आंतरराष्ट्रीय तोतरेपणा जनजागृती दिन: समज, स्वीकृती आणि संवादघरफाळा थकबाकीदारांच्या 2 व्यावसायिक आस्थापना सीलक्षयरोगाचे प्रसारमार्ग, लवकर निदान व मोफत उपचारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीकेडीसीसी बँकेकडून संस्थांना डिव्हीडंड पोटी ३१ कोटी रुपये अदा; कर्मचाऱ्यांना बोनस व अर्धा पगार बक्षीसपोटी १२ कोटी अदाडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या दोन विद्यार्थ्यांना ‘टॉप २५ ॲम्बेसेडर’मध्ये स्थानइचलकरंजीत कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा; शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण!शिक्षक मतदारसंघ निवडणूक: प्रफुल्ल तावरे यांचा जयंत आसगावकर यांना जाहीर पाठिंबासुसंस्कृत समाज निर्मितीसाठी साहित्य महत्वाचे : डाॅ. हूबनाथ पांडेय

जाहिरात

 

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना ९१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

schedule22 Oct 26 person by visibility 124 categoryसामाजिक

◼️डॉ. संजय डी. पाटील, पृथ्वीराज पाटील यांच्याकडून आदरांजली
◼️डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कृषी व तंत्र विद्यापीठात प्रतिमापूजन व आदरांजली

कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटवणारे  पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दासाहेब) यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे प्रतिमापूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ येथे झालेल्या कार्यक्रमात कुलपती तथा ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील  आणि विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, साळोखेनगरचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजित माने, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी डॉ. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी तळसंदेच्यावतीने डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ येथे डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली. कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डॉ. एस. आर. पावसकर, प्रा. डी. एन. शेलार यांच्यासह सर्व संस्थांचे प्रमुख, प्राचार्य,  प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes