SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
३०० दिवस, ३०० मैफिली : ‘निक्षय गीत’ उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथशिरोळ तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे आदेशलोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचा पाया: राष्ट्रीय पंचायत राज दिवसराज्यात ऊर्जा क्रांती: ५,२०० कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी; कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात उभे राहणार तीन जलविद्युत प्रकल्पविधानसभा निवडणुकांचा धुरळा: पश्चिम बंगालमध्ये ९०%, तर तमिळनाडूमध्ये ८२% मतदान; बारामती-राहुरीचा कौलही मतपेटीत बंदगांधीनगरपर्यंतच्या महापालिकेच्या हद्दीतील जागेवरील बांधकामांची तपासणी करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडएचव्हीएसीआर क्षेत्रात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अपार संधी : योगेश गांधीविद्यार्थ्यांसाठी ई - लायब्ररीस प्रारंभक्रीडा प्रबोधनी प्रवेश - 27 एप्रिलपासून निवड चाचणीचे आयोजन कागलच्या ए डी माने इंटरनॅशनल ॲकॅडमीच्या पार्थ सुतारने बुद्धिबळ स्पर्धेत पटकावले अजिंक्यपद

जाहिरात

 

३०० दिवस, ३०० मैफिली : ‘निक्षय गीत’ उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

schedule24 Apr 26 person by visibility 109 categoryराज्य

कोल्हापूर : प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान (निक्षय मित्र) अंतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहार देण्याच्या उद्देशाने कोल्हापुरात राबविण्यात येत असलेल्या “निक्षय गीत मैफिल” या नाविन्यपूर्ण सांगीतिक उपक्रमाने ३०० मैफिलींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. जिल्हा क्षयरोग केंद्राच्या सहकार्याने जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

 जागतिक संगीत दिन (२१ जून २०२५) निमित्त सुरू झालेल्या या उपक्रमाचा कालावधी २० जून २०२६ पर्यंत असून, सलग ३०० दिवसांत ३०० मैफिली आयोजित करून एक वेगळाच आदर्श निर्माण करण्यात आला आहे. 

साने गुरुजी वसाहत येथील विकास प्रतिज्ञा स्टुडिओमध्ये प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेचे प्रशांत जोशी, राजेंद्र चौगुले, नीलांबरी जाधव, प्रीती देसाई, नरहर कुलकर्णी, दिलीप माळी, अभिजीत पाटील, प्रसन्न कुलकर्णी, अमरसिंह राजपूत आदी कलाकार फेसबुक लाईव्ह व प्रत्यक्ष सादरीकरणाच्या माध्यमातून या मैफिली सादर करतात. या उपक्रमातून जमा झालेल्या निधीतून जाणीव फाउंडेशनमार्फत क्षयरुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात येत असून, आतापर्यंत ७९ किटचे वाटप झाले आहे. या उपक्रमासाठी नागरिकांनी आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन जाणीव फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा बटकडली यांनी केले आहे.

या उपक्रमास मदत करण्यासाठी निधी जनता सहकारी बँक लिमिटेड,पुणे शाखा- शाहूपुरी (IFSC CODE- JSBP0000029) खाते क्रमांक -029230100006553 या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करावी असे आवाहन जाणीव फाउंडेशन, कोल्हापूर च्या अध्यक्षा श्रीमती सुषमा बटकडली यांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes