SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; कोल्हापूर पोलिसांच्या कामगिरीवर ५० हजारांचे बक्षीसकोल्हापूरचे किशोर घाटगे यांची 'ग्राहक संरक्षण समिती'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवडआंतरराष्ट्रीय खेळ दिन: बालपणाचा अविभाज्य आनंद आणि हक्ककोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमराज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयबिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाईॲपद्वारे खत खरेदीची सक्ती रद्द करावी; आमदार सतेज पाटील यांची मागणी..चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनजयसिंगपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेसमोरील विषयांना बहुमताने मंजुरी

जाहिरात

 

क्रीडा प्रबोधनी प्रवेश - 27 एप्रिलपासून निवड चाचणीचे आयोजन

schedule23 Apr 26 person by visibility 343 categoryक्रीडा

कोल्हापूर :  सन 2026 - 27 या वर्षाकरिता क्रीडा प्रबोधनी - कोल्हापूर विभागांतर्गत दिनांक 27 ते 29 एप्रिल या कालावधीमध्ये सांगली , सातारा व कोल्हापूर या ठिकाणी विविध खेळांच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे .

    27 एप्रिल रोजी सातारा येथे शाहू जिल्हा क्रीडा संकुलात जलतरण,सायकलींग व बॅडमिंटन 28 एप्रिल रोजी छ.संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे हॉकी,शिवाजी विद्यापीठात - ॲथलेटिक्स आणि मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे हॉकी तर 29 एप्रिल रोजी सांगली येथे दमाणी हायस्कूलमध्ये हँडबॉल व मिरज येथील क्रीडा संकुलामध्ये जुदो व जिम्नॅस्टिक चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे .

  कोल्हापूर विभागातील सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी  व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्था,खेळाडू, क्रीडा संस्था आणि एकविध क्रीडा संघटना यांनी आपल्या खेळाडूंना सदर चाचण्यांमध्ये सहभागी करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय - कोल्हापूर या ठिकाणी संपर्क करावा .निवड झालेल्या खेळाडूंना दैनंदिन प्रशिक्षण ,निवास ,भोजन ,शिक्षण व क्रीडा गणवेश आदी सुविधा शासनाद्वारे पुरविण्यात येणार असल्याची माहिती सुहास पाटील उपसंचालक क्रीडा व युवक सेवा-कोल्हापूर विभाग यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes