SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीईच्या २९ विद्यार्थींनींची कॅपजेमिनी या नामांकीत कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवरती निवडजिल्हाधिकारी कार्यालय येथे 27 वा कारगिल विजय दिवस साजराडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवडजलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार : जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील​"मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही"महसूल सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरकारगिल विजय दिवस: भारतीय शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचा सुवर्णदिनआषाढी एकादशीनिमित्त ‘गोकुळ’च्या दुधाची उच्चांकी विक्रीबालकांचे शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरलाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारविरोधात कोल्हापुरात काँग्रेसचा कॅन्डल मार्च

जाहिरात

 

गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत : उदय शिंदे यांचे आवाहन

schedule25 Jul 26 person by visibility 271 categoryउद्योग

◼️गोकुळच्या कर्मचाऱ्यांना कायद्यानेच मतदानाचा अधिकार
      
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत, असे आवाहन कर्मचाऱ्यांच्यावतीने  उदय शिंदे यांनी केले आहे. गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना कायद्यानेच मतदानाचा अधिकार आहे, असेही  शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.
           
या पत्रकात  शिंदे यांनी पुढे म्हटले आहे, गोकुळ दूध संघाच्या कर्मचा-यांना मतदानाचा अधिकार नाही म्हणून ठराव बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये वाचल्या. वास्तविक; अशा अफवांपासून गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी दूर राहिले पाहिजे. गोकुळचा कर्मचारी हा गोकुळचा एक महत्त्वाचा व  जबाबदार घटक आहे. या निवडणुकीत गोकुळच्या कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.                             

ज्या कर्मचाऱ्यांनी गोकुळ दूध संघाला दूध मिळावे म्हणून संस्था काढल्या आणि आपल्या नावावर ठराव केले, त्यांना महाराष्ट्र राज्य सहकार कायदा- १९६० आणि दस्तुरखुद्द गोकुळ दूध संघाच्या उपविधीनुसार अधिकार प्राप्त होतो. त्यामध्ये घाबरून जाऊन विचलित होण्याचे काहीही कारण नाही. फक्त मल्टीस्टेट/  बहुराज्यीय कायद्याखाली नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांमध्येच कर्मचाऱ्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे; गोकुळच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या अजिबात हालचाली करू नयेत आणि त्यांनी या निवडणुकीत ठाम भूमिका वठवावी.
       
*◼️हे तर भूमिपुत्रच......!*
शिंदे यांनी म्हटले आहे, गोकुळ दूध संघाचे बहुतांशी कर्मचारी हे कोल्हापूर जिल्ह्यातील भूमिपुत्र शेतकऱ्यांचीच मुले आहेत. आपापल्या गाव- खेड्यातील दूध संस्थांचे ते दूध उत्पादक सभासदही आहेत. गोकुळच्या स्थापनेपासूनच्या आजवरच्या वाटचालीत त्यांचे योगदानही मोठे आहे. संबंधित दूध संस्थांनी तसा ठराव करून दिल्यानंतर मतदार म्हणून ते कायद्यानेच हक्कधारक आहेत. गोकुळ दूध संघाच्या यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही अनेक कर्मचारी ठरावधारक होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes