पाणी पुरवठा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी उत्तम जाधव, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र येळवडे
schedule24 Apr 25 person by visibility 369 categoryउद्योग

कोल्हापूर : पाणी पुरवठा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या, कोल्हापूर या संस्थेच्या नुतन चेअरमनपदी उत्तम मारुती जाधव, तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र बापूसाो येळवडे यांची निवड झाली. संचालक मंडळाची सभा अध्यक्ष/अध्यासी अधिकारी एम्.ए. मुरूडकर, (सहकारी. अधिकारी श्रेणी-१ अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था. कोल्हापूर), यांचे अध्यक्षतेखाली झाली.
संस्थेच्या नुतन चेअरमनपदी उत्तम जाधव यांचे नांव कृष्णात मोहिते यांनी सुचविले त्यास अनुमोदन राजेंद्र जाधव यांनी दिले. व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र येळवडे यांचे नांव दगडू मोहिते यांनी सुचविले त्यास अनुमोदन बाबासाो कांबळे, यांनी दिले. या निवडी एक मताने झाल्या.
तसेच कळंबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पूनम उत्तम जाधव यांची निवड झाल्याबद्ल संस्थेच्या वतीने सत्कार करणेत आला. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक तसेच श्री. राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑप. बँकेचे मा. अध्यक्ष व विद्यमान संचालक शशिकांत तिवले तसेच संस्थेचे माजी चेअरमन प्रकाश भुर्के, व्हाईस चेअरमन प्रविण चौगुले. विद्यमान संचालक कृष्णात मोहिते, प्रकाश आंबी, राजेंद्र जाधव, संजय मोरे, दगडू मोहिते, बाबासाो कांबळे, अवघडी हजारे, श्रीमती. सुमन पोवार, श्रीमती. रेखा पडळकर, संजय चव्हाण, शिवाजी पाटील सेक्रेटरी ज्ञानदेव खराडे, संस्थेचे माजी संचालक, सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.