SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

केआयटीच्या विश्व तांबेचे आशियाई पॅरा युथ गेम्समध्ये घवघवीत यश; दोन रजत पथकांची कमाई करत राष्ट्रीय मानांकन यादीत अव्वल

schedule27 Dec 25 person by visibility 456 categoryक्रीडा

कोल्हापूर  : येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी विश्व तांबे याने दि.१० ते १२  डिसेंबर रोजी दुबई येथे संपन्न झालेल्या आशियाई पॅरा युथ गेम्स मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला.

टेबल टेनिस या खेळामध्ये त्याने पुरुष एकेरी क्लास १० मध्ये व मिक्स डबल क्लास २० मध्ये दोन रजत पदकांची कमाई केली. आज विश्व ताम्बेने वर्ल्ड रँक ४४ , यु.२३ वर्ल्ड रँक -१३ आणि राष्ट्रीय स्तरावरील मानांकन यादीमध्ये प्रथम मानांकनला गवसणी घातलेली आहे.केआयटीने महाविद्यालयात विद्यार्थ्यांमधील खेळ संस्कृतीला नेहमीच बळ दिले आहे.गेल्या २-३ वर्षात असे ५-६ विद्यार्थी खेळाडू आहेत ज्यांनी केआयटीच्या आर्थिक सहकार्याने व प्रोत्साहनाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला गौरव प्राप्त करून दिला आहे.

भविष्यातही क्षमतावान खेळाडूंना सर्वप्रकारचे सहकार्य केआयटी करेल असा विश्वास मा.संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केला.

संस्थेचे सचिव  दीपक चौगुले, संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी त्याचे आज विशेष अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली ,उपाध्यक्ष  सचिन मेनन अन्य  विश्वस्त यांचे त्याला प्रोत्साहन लाभले. मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर,महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा.विजय रोकडे यांचे मोठे सहकार्य त्याला लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes