SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यतामाजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनमहावितरणच्या विविध कामांचे पालकमंत्री यांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी लोकार्पणपशुपालकांसाठी सुवर्णसंधी: 'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड' अंतर्गत ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य;१० लाख पशुपालकांना लाभ देण्याचे उद्दिष्टशिवाजी विद्यापीठाचा एक्सलॉजिया कंपनीसमवेत सामंजस्य करार‘गोकुळ’ची ५ वर्षे संकल्पपूर्तीची, विश्वास वृद्धिंगत करणारीवारसा जतन : काळाची गरज आणि आपली जबाबदारी

जाहिरात

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला भेट देवून खासदार महाडिक यांनी साधला संवाद

schedule15 Apr 26 person by visibility 215 categoryराज्य

कोल्हापूर  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, खासदार धनंजय महाडिक यांनी हातकणंगले येथील मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहाला भेट दिली. वसतिगृहातील व्यवस्थेची पाहणी करून, खासदार महाडिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी, अपेक्षा समजून घेवून खासदार महाडिक यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू आणि त्यांच्या संघर्षाच्या गाथा, विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. बाबासाहेबांनी आयुष्यभर शिक्षणाला प्रगतीचे मुख्य साधन मानले. विद्यार्थ्यांनीसुध्दा शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हा विचार कायम ठेवत, देशाला महासत्ता बनवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.

 विद्यार्थ्यांशी केलेली ही चर्चा अत्यंत सकारात्मक ठरली. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुचवलेल्या नवीन अत्याधुनिक संगणक कक्षाचे उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.

 सध्याच्या डिजिटल युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे पडू नयेत, हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर खासदार महाडिक यांनी वसतिगृहातील मुला-मुलींसोबत भोजनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेवून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास खासदार महाडिक यांनी दिला. समाजातील शेवटच्या घटकातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांना नव्या युगातील तंत्रज्ञान स्नेही बनवणे, हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. 

याप्रसंगी कोल्हापूर समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त सचिन साळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस सतीश पंडित, शहाजी भोसले, हातकणंगलेचे मंडलाध्यक्ष शितल हावले, वडगावचे अमर पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष पंकज बुद्धे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes