SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यतामाजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या ‘एनव्हिजनिंग इंडिया’च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनमहावितरणच्या विविध कामांचे पालकमंत्री यांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी लोकार्पणपशुपालकांसाठी सुवर्णसंधी: 'पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड' अंतर्गत ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य;१० लाख पशुपालकांना लाभ देण्याचे उद्दिष्टशिवाजी विद्यापीठाचा एक्सलॉजिया कंपनीसमवेत सामंजस्य करार‘गोकुळ’ची ५ वर्षे संकल्पपूर्तीची, विश्वास वृद्धिंगत करणारीवारसा जतन : काळाची गरज आणि आपली जबाबदारीमोदी सरकारला मोठा धक्का: लोकसभेत महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक फेटाळले!

जाहिरात

 

महावितरणच्या विविध कामांचे पालकमंत्री यांच्या हस्ते १९ एप्रिल रोजी लोकार्पण

schedule18 Apr 26 person by visibility 92 categoryराज्य

◼️नव्याने पूर्ण झालेल्या कामांतून ३०७८ शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

 

कोल्हापूर : महावितरणने वीज ग्राहकांच्या सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या दृष्टीने गारगोटी व राधानगरी उपविभागात विविध कामे केली आहेत. या कामांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज (दि. १९ एप्रिल) रोजी करण्यात येत आहे. मुदाळ तिट्टा  (ता. भुदरगड) येथे सकाळी ०९.३० वाजता व कडगाव उपकेंद्र, तिरवडे (ता. भुदरगड) येथे सकाळी १०.३० वाजता हे कार्यक्रम होणार आहेत.  

राज्य शासनाकडून नागरिकांचे व प्रामुख्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहेत. या योजनेतून महावितरणनेगारगोटी व राधानगरी तालुक्यात अनेक कामे केली आहेत. यामधील मुदाळ तिट्टा उपकेंद्राची पाच एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसवून क्षमता वाढ करण्यात आली आहे तर कडगाव उपकेंद्र, तिरवडे येथे चार मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या दोन्ही कामांचे लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज(दि. १९ एप्रिल) होणार आहे.

मुदाळतिट्टा उपकेंद्राची पाच एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसवून क्षमता वाढ करण्याकरता १.४० कोटींचा खर्च आला आहे. यामुळे १३ गावांतील १५६८ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. तर कडगाव उपकेंद्र, तिरवडे येथे चार मेगावॉट क्षमतेचा सौर  प्रकल्प उभारण्याकरता सुमारे १४ कोटींचा खर्च आला आहे. या उपकेंद्रातून २२ गावांतील १५१० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. या दोन्ही लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमांस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महावितरण ने केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes