SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पनाकोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियानमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदानकातळशिल्पांच्या संशोधनाकरिता वर्ल्ड हेरिटेज डेस्क स्थापन : मंत्री ॲड. आशिष शेलार बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहनमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची विवेक भीमनवार यांना पद व गोपनीयतेची शपथ१९४६: ब्रिटिश राजवटीला हादरवणारा मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील नौदल उठाव...कोल्हापुरात घरगुती वादातून पत्नीची हत्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पतीला ८ तासांत ठोकल्या बेड्याशिवजयंती निमित्त पन्हाळा गडावर 'मेगा पदयात्रा' दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजनकोटीतीर्थ मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले सहा दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सील

जाहिरात

 

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

schedule18 Feb 26 person by visibility 113 categoryराज्य

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे.  या रिक्त होणाऱ्या जागांसाठी येत्या 16 मार्च 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील रिक्त होणाऱ्या जागासाठी ही निवडणूक होणार आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य असलेले डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास आठवले या सात सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपणार आहे. या निवडणुकीची 26 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2026 असेल. अर्जांची छाननी 6मार्च रोजी केली जाणार असून 9 मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील. मतदान 16 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

 मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या विशेष जांभळ्या स्केच पेनचाच वापर करणे बंधनकारक असेल असे आयोगाने स्पष्ट केले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 20 मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes