SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात घरगुती वादातून पत्नीची हत्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पतीला ८ तासांत ठोकल्या बेड्याशिवजयंती निमित्त पन्हाळा गडावर 'मेगा पदयात्रा' दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजनकोटीतीर्थ मार्केट व छ.शिवाजी मार्केट मधील थकबाकी असलेले सहा दुकानगाळे इस्टेट विभागामार्फत सीलकेंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी तरतूद महत्वाचीडीकेटीई आणि एमकेसीएल यांच्यात सामंजस्य करार संपन्नपदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देऊ : दिपक चव्हाण; शिवसेनेच्या वतीने दीपक चव्हाण यांचा निवडीबद्दल सत्कारबालविवाह मुक्त जिल्ह्यासाठी आढावा बैठक संपन्नप्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेतकेआयटी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘आयडियाथॉन’ ची सांगता, ७१ इनोव्हेशन व सृजनशी कल्पनांचे तरुणाईकडून सादरीकरणसंजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

जाहिरात

 

कोल्हापुरात घरगुती वादातून पत्नीची हत्या; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पतीला ८ तासांत ठोकल्या बेड्या

schedule17 Feb 26 person by visibility 145 categoryगुन्हे

कोल्हापूर: घरगुती वादातून पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या ८ तासांत अटक केली आहे. गणेश शंकर हुबाळे (वय ४०, रा. शनिवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपी गणेश हुबाळे याचे पत्नी स्वाती हुबाळे हिच्यासोबत घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात गणेशने स्वातीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत तिला खाजगी रुग्णालयात दाखल करून आरोपी पसार झाला होता. मात्र, उपचारादरम्यान १७ फेब्रुवारी रोजी स्वातीचा मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा (BNS १०३(१)) दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी समांतर तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सागर वाघ व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे, सीपीआर रुग्णालयाजवळील बासुरी हॉटेलच्या पाठीमागे सापळा रचून गणेश हुबाळेला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत त्याने सततच्या वादातून पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. ही कारवाई एलसीबी आणि लक्ष्मीपुरी पोलीस पथकाने संयुक्तपणे यशस्वी केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes