दूधगंगा नदीत बुडालेल्या निपाणीतील दोघा पर्यटकांचे मृतदेह सापडले
schedule02 Jul 24 person by visibility 514 categoryगुन्हे
कोल्हापूर : काळम्मावाडी येथे धरणासमोरील दूधगंगा नदीच्या पाण्याच्या डोहात निपाणी येथील प्रतिक संजय पाटील व गणेश चंद्रकांत कदम हे काल सोमवारी बुडाले होते. आज, मंगळवारी एनडीआरएफ'च्या टीमला रेस्क्यू करताना त्यांचे मृतदेह हाती लागले.
आज मंगळवारी सकाळपासूनच संततधार पावसात शोध मोहीम सुरू होती. सकाळी ११ वाजता प्रतीक पाटील तर दुपारी १२च्या सुमारास गणेश कदम यांचा मृतदेह एनडीआरएफ'च्या रेस्क्यू टीमला सापडला.
दूधगंगा नदी येथे काल सोमवारी वर्षा पर्यटनाला आलेला गणेश कदम हा युवक दूधगंगा नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला. तो डोहात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी सोबत असलेला प्रतीक चालक यांने डोहात उडी घेऊन गणेश ला वाचवण्याचा प्रयत्न केला पण दोघेही पाण्यात बुडाले होते.