कोल्हापूर जिल्हा बँकेची धुरा कुणाकडे?
schedule20 Jan 22 person by visibility 145 categoryराजकीय
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड पार पडणार आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार पी.एन पाटील यांचं नाव आघाडीवर आहेत . तर, उपाध्यक्षपदासाठी आमदार राजीव आवळे आणि श्रुतिका काटकर यांची नाव चर्चेत आहे. आज दुपारी तीन वाजता निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पॅनेलनं विजय मिळवला आहे. त्यांच्यापुढं शिवसेनेच्या वतीनं निवडणुकीत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.