SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पालघर अपघात : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरिततात्काळ आपत्तीजन्य इशारे प्रसारित होण्यासाठी राज्य शासनाची अर्ली वॉर्निंग सिस्टम अधिक सक्षमगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करणार : जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटीलजागतिक नाविक दिन: जागतिक अर्थव्यवस्थेचे अनमोल शिल्पकार​"कोल्हापूरच्या हद्दवाढीवर निर्णय घ्या, ...": आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात केली सरकारची कोंडी!राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे 26 जून रोजी उद्घाटनशिरोळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायत इमारतींसाठी १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा पाठपुरावा विद्यार्थीसंख्या वाढीसाठी गुणवत्ता आणि विश्वासार्हता आवश्यक : डॉ. विलास शिंदेकळंबा तलावातील गाळ उपशासाठी शेतकऱ्यांना महापालिकेचे आवाहनबोगस डॉक्टरांचे आता खैर नाही! 'नो युवर डॉक्टर' क्यूआर कोड स्कॅन करा आणि तपासा; हसन मुश्रीफ यांचा इशारा

जाहिरात

 

खडतर परिश्रम घेऊन यशस्वी व्हा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

schedule30 Aug 25 person by visibility 568 categoryसामाजिक

कोल्हापूर : आपल्यातील कलागुण व कौशल्य ओळखून त्याचा विकास करा. अवांतर वाचन करा. सोशल मीडियाचा वापर अधिकाधिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी करा. जीवनात ध्येय निश्चित करा आणि खडतर परिश्रम घेऊन यशस्वी व्हा, अशा शब्दांत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिरोळ तालुक्यातील जनतारा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत यशस्वी झालेले 42 विद्यार्थी तसेच गायन व स्पोर्ट्समधील यशस्वी विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी  येडगे यांनी स्पर्धा परीक्षा तसेच करिअर बाबत मार्गदर्शन केले. यावेळी जनतारा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.

दरम्यान हरोली येथे सुरु करण्यात आलेल्या नवीन अभ्यासिकेचे उद्घाटन जिल्हाधिकारी  येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हरोलीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.

 तसेच त्यांनी तालुका कृषी रोपवाटिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध फळझाडांच्या व केशर आंबा लागवडीची माहिती घेऊन आंबा विक्रीत वाढ करण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शिरोळ तहसीलदार अनिल कुमार हेळकर, उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes