केआयटीमध्ये ‘प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व स्टार्टअप्सचा क्षमता विस्तार’ या विषयी कार्यशाळा उत्साहात
schedule19 Jun 24 person by visibility 465 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : येथील केआयटी च्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशन च्या वतीने ‘स्टार्टअप्स बॅटल्स- विस्तार आणि यश’ अशा शीर्षकाची अत्यंत अनोखी स्पर्धा आयोजित केलेली आहे. कोल्हापूर परिसरातील स्टार्टअप्स व इनोव्हेटर्स ना ही स्पर्धा खुली असून या स्पर्धे ची एकूण बक्षीस रक्कम रुपये १.५ लाख रुपये आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २१ जून २४ आहे. या स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी दोन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व स्टार्टअप चा क्षमता विस्तार’ या विषयावर दि. १५ व १६ जून २०२४ रोजी ही कार्यशाळा संपन्न झाली. संशोधक व नवउद्योजकांनी प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व व्यवसायाच्या क्षमता विस्तार करण्यासाठी कशा प्रकारची योजना करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून निलेश लेले अध्यक्ष चेंबर ऑफ ऍडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडीयम बिझनेस, डॉ.एन.अपर्णा राव असोसिएट प्रोफेसर, एन.एम.आय.एम.एस. उपाध्यक्ष डब्ल्यू.आय.सी. सी.आय.एस.बी.सी.काम केले. सादरीकरण,केस स्टडीज, सामुहिक चर्चा,प्रश्नोत्तरे अशा सत्रातून रंगलेल्या या कार्यशाळेमध्ये परिसरातील नवउद्योजक व संशोधकांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती.
केआयटी आय.आर.एफ.चे सीईओ सुधीर अरळी, इंक्युबेशन मॅनेजर देवेंद्र पाठक, इंक्युबेशन असोसिएट .अन्जोरी कुम्भोजे, पार्थ हजारे यांनी या कार्यक्रमाचे सूक्ष्म व यशस्वी नियोजन केले.
संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी,अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली,सचिव दीपक चौगुले अन्य विश्वस्त यांचे मोलाचे प्रोत्साहन व सहकार्य या कार्यशाळेस लाभले.