SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
उच्च राजकीय-सामाजिक नैतिकतेचे दुसरे नाव म्हणजे डॉ. एन. डी. पाटील: किशोर बेडकीहाळशासनाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन सेवांवरच अवलंबून : राज्य आयुक्त सुधाकर तेलंगफुटबॉलच्या रणांगणात आज 'महामुकाबला': मेस्सीच्या जादूची की केनच्या करिष्म्याची गाजणार दहशत?फीफा वर्ल्ड कप २०२६: स्पेनचा दणदणीत विजय; फ्रान्सला धूळ चारत गाठली अंतिम फेरी!जागतिक युवा कौशल्य दिन: भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरणगौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करण्यास मान्यताशिवाजी विद्यापीठाचा इन्फ्राप्लान समुहासमवेत सामंजस्य करार; जलविद्याविषयक संशोधनाला गती मिळणारराष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएच.डी.अंबाबाई मंदिराचे जतन-संवर्धन योग्य मार्गावर: पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले पाणीगळतीचे कारण!

जाहिरात

 

'गोकुळ’ मध्ये योग दिन उत्साहात साजरा...

schedule21 Jun 24 person by visibility 561 categoryउद्योग

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने जागतिक योग दिनानिमीत्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली व संचालक यांच्‍या उपस्थित योग दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी योगमित्रचे योग शिक्षक संजय पोवार यांनी योगाचे महत्‍व पटवून देवून प्रात्‍यक्षिके करुन दाखवलीत.

 यावेळी मार्गदर्शन करताना संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील म्‍हणाले कि, दैनंदिन कामाच्‍या धावपळीत माणसाला उसंत मिळत नाही. कामाचा व्‍याप पैश्‍यामागची धडपड किंवा यश,कीर्ती,अर्थप्राप्‍ती इत्‍यादी मध्‍ये आरोग्‍य रक्षण होवूनही दीर्घायुष्‍य हा भाग चिंतनीय आहे. सध्‍याच्‍या धावपळीच्‍या जगात निरोगी शरीर व आनंदी मनासाठी. योग हा एकमेव उपाय असून नित्‍य नियमाने योगासने करावी असे प्रतिपादन गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील (आबाजी) यांनी जागतिक योग दिनानिमीत्‍य आयोजित केले योग शिबीरा प्रसंगी केले. यावेळी योग विद्येतील विविध योगासनांची प्रात्‍यक्षिके, उदा.सर्वांगासन,पादान्‍गुष्‍टासन, शशिकासन, मंडूकासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, विपरीत नौकासन, पर्वतासन, ताडासन इ.आसने श्री.पाटील यांनी कर्मचा-यांसमोर सादर करुन सदरची योगासने कर्मचा-यांकडून करवून घेतली आणि ही आसने नित्‍यनियमाने सर्व कर्मचा-यांनी करावीत असे आवाहनही त्‍यांनी केले.

  यावेळी योगमित्रचे शिक्षक संजय पोवार व विशाल गुडूळकर यांनी योगा विषय सविस्तर माहिती दिली व प्रात्यक्षिके करून दाखवली. या कार्यक्रमाचे सूञ संचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले.


 या कार्यक्रम प्रसंगी संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील , संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, सहा.महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, संगणक सहा.व्यवस्थापक व्ही.व्ही.जोशी, खरेदी व्यवस्थापक के.एन.मोळक, अभियांत्रिकी व्यवस्थापक प्रताप पडवळ, पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ.पी.जे.साळुंखे, डॉ.प्रकाश दळवी, संकलन सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, बी.आर.पाटील, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील, बी.एस.मुडकशिवाले संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes