SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केडीसीसी बँक वार्षिक पतपुरवठा, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पीक कर्ज वाटपामध्ये अग्रस्थानीमाणिक पाटलांच्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; मुंबईत लवकरच बैठक होणार!सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले!राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या प्रारंभ खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरडी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या डॉ. निरांत पाटील यांचा राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात ठसाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ठरावसंख्या १,९८२ होणार : जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा दावापेपरफुटी'चे महाराष्ट्र मॉडेल: लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा लिलाव, TET परीक्षा रद्द!शाहीर सरसेनापती पुरस्कारांचे उद्या रविवारी वितरणजागतिक आर्थिक विकासाचा कणा: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग

जाहिरात

 

भाजप सरकारने महिलांना स्वावलंबी करून सक्षम बनवले : खासदार धनंजय महाडिक

schedule30 Nov 25 person by visibility 377 categoryराजकीय

▪️मुरगूड नगरपरिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन

कोल्हापूर  : भाजप सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. तसेच मुरगूड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीच्या आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. मुरगूड येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

कागल तालुयातील मुरगुडमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट युतीच्या आघाडीच्या उमेदवारांची जाहीर सभा झाली. सभेला मोठ्या संख्येने मतदारांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. तर भाजप सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली असून, विकास हाच राज्यातील भाजप सरकारचा प्रमुख अजेंडा आहे. मुरगूडमधील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, शहर सौंदर्यीकरण याच्यासह सर्वांगीण विकासाला गती देणार आहोत. त्यामुळे मुरगूड शहराच्या विकासाची चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले.

 यावेळी भाजपाचे नेते प्रवीणसिंह पाटील, सुहासिनी पाटील, आघाडीचे नेते वीरेंद्र मंडलिक, महेश जाधव, नामदेवराव मेंडके, प्रकाश गोधडे, दिग्विजय पाटील, जयसिंग भोसले, भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes