शिरोली परिसरात चेन स्नॅचिंगः पाच लाखांचा ऐवज लुटला
schedule02 Nov 24 person by visibility 289 categoryगुन्हे
कोल्हापूर : महामार्गावर शिरोली एमआयडीसी परिसरात दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरणाऱ्या दोन घटना आज शनिवारी रहादारीच्या ठिकाणी या घटना घडल्या.
या दोन्ही घटना आज सकाळी आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास महामार्गावर मनुग्राफ व एस. जे. आयर्न या कंपनी दरम्यान घडल्या. माधुरी प्रकाश पाटील (रा. मालभाग हेरले) व विमल दादासो शिंदे (रा. चोकाक ता. हातकणंगले) या आपआपल्या कामासाठी शिरोली ते वडगाव कडे निघाल्या होत्या. अज्ञात चोरट्यानीं त्यांचा पाठलाग करत गाडीवरून गळ्यातील सोन्याचे गंठण व लक्ष्मी हार असा सुमारे पाच लाख रुपयांचा माल लंपास केला.
या दोन्ही घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.