SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे मॉडेल युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रतिनिधित्वाची संधीकोंडीग्रे येथील आरोग्य शिबिरात ४२२ नागरिकांची तपासणीपदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने मैदानात उतरावे : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणगोकुळ निवडणुकीत मंत्र्यांच्या मुलाविरोधात सर्वसामान्य शेतकरीपुत्र मैदानात; शशिकांत खोतांचा जोरदार हुंकार!शिक्षकांच्या अन्यायाविरोधात रोष! पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर ‘एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेने’चा बहिष्कारथकबाकीदारांना नोटिसा बजावून वसुली करा, अन्यथा मिळकतींवर बोजा नोंदवा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडरग्गेडियनच्या ‘रंगताली’ दांडिया-गरबा नाईटला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसादमहायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचा विश्वासआंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन: एक महत्त्वपूर्ण जागतिक मोहीम

जाहिरात

 

बिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार : आमदार सतेज पाटील

schedule24 Aug 26 person by visibility 770 categoryउद्योग

कोल्हापूर : सध्या  गोकुळच्या बिनविरोध निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही. जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यासाठी गोकुळमध्ये एकहाती सत्ता असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ही निवडणूक मी पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. 

आमदार पाटील यांनी करवीर तालुक्यातील ठरावधारकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन संवाद साधला यावेळी गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नसून मी पॅनल उभे करून दूध संघाची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील यांनी  करवीर तालुक्यातील कांडगांव, देवाळे, हळदी, सडोली खालसा, गाडेगोंडवाडी, आरे, बाचणी, हिरवडे खालसा, हसूर, पाटेकरवाडी, म्हालसवडे, कांचनवाडी आणि सावर्डे दुमाला या गावांमधील ठरावधारकांची भेट घेऊन संवाद साधला. 

ठरावधारकांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, गोकुळ दूध संघाची निवडणूक मी पूर्ण ताकतीने लढवणार आहे. मी पॅनल उभे करून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या बिनविरोध निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही. जिल्ह्यातील पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्यासाठी गोकुळमध्ये एकहाती सत्ता असणे अत्यंत गरजेचे आहे.

गेल्या पाच वर्षांत दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. दुधाला दोन रुपये दर वाढ देण्याचा शब्द आम्ही दिला होता तो पूर्ण करून ५ वर्षात म्हैशीस १४ रुपये व गाई दुधास १० रुपये अधिक दर देण्याचे काम आम्ही केलं. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आणि ठरावधारकांचा आमच्यावर पूर्ण विश्वास असून संपूर्ण करवीर तालुक्यातून अत्यंत सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रचारा दरम्यान सडोली खालसा येथे आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार संपतराव पवार-पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य क्रांतीसिंह पवार-पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोलताना माजी आमदार संपत पवार पाटील यांनी, गेल्या पाच वर्षांत गोकुळ दूध संघात उत्तम काम झाले असून दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांना योग्य दर देणे ही मोलाची कामगिरी आपल्या हातून घडली आहे अशा शब्दांत कामाचे कौतुक केले.

यावेळी जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, अभिषेक तायशेटे, प्रकाश पाटील, एम. के. पाटील, रणजीतसिंह पाटील, माजी संचालिका उदयानी साळुंखे, शशिकांत खोत, उदय पाटील, रणधीर मोरे, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, युवराज पाटील, एस. बी. पाटील, सचिन पाटील, सर्जेराव भोसले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes