SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रयत्नांच्या जोरावर यशाचे शिखर गाठा : माजी प्राचार्य विजय डोणे आठवणींना उजाळा, मैत्रीला नवा श्वास : कोरे; अभियांत्रिकी २००० बॅचचा रौप्यमहोत्सवसेंट्रल पार्कची कामे गतीने पूर्ण करा : उपमुख्यमंत्री अजित पवार; उपमुख्यमंत्र्यांकडून शहरातील विकासकामांची पाहणीशिवाजी विद्यापीठात दि. ३० डिसेंबर रोजी ‘संत साहित्य संमेलन’नवीन शैक्षणिक धोरण व शारीरिक शिक्षण आरोग्य याचे महत्त्व : ✍️ डॉ अजितकुमार पाटील, कोल्हापूरगडचिरोली पोलीस दलाच्या बळकटीसाठी 34 नव्या वाहनांचा ताफा दाखलश्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंदप्रजासत्ताक दिन परेड शिबिरासाठी अकरा NCC विद्यार्थ्यांची निवड; कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरामतदान केंद्रावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण रविवारीसंजय घोडावत विद्यापीठात “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

जाहिरात

 

राजकारणातील हुकूमशाहीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर 'उत्तर' च्या रिंगणात : हाजी अस्लम सय्यद

schedule22 Mar 22 person by visibility 9629 categoryराजकीय

कोल्हापूर : राजकारणात मी म्हणेल तीच पूर्व दिशा अशी भूमिका घेणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीला धक्का देण्यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची घोषणा हाजी अस्लम सय्यद यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली.

२०१९ साली हातकणंगले लोकसभा मतदार संघात निवडणूक लढलेले हाजी असलम सय्यद यांनी गत निवडणुकीत तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढताना दीड लाखाच्या आसपास मते घेतली होती. बहुजन वंचित आघाडी कडून लढलेल्या अस्लम सय्यद यांच्यामुळे राजू शेट्टी यांना पराभव पत्कारावा लागला होता. शिवाय तो मतदारसंघ सय्यद यांच्यासाठी नवीनच होता. तो लोकसभा मतदारसंघ असल्याने आकाराने मोठा होता. ७२२ गावांपैकी फक्त शंभर गावापर्यंत प्रचार मोहीम राबवण्यात आली होती. तरी ही लक्षणीय मते मिळाली होती. कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ आकाराने छोटा आहे शिवाय या मतदारसंघात मोठा जनसंपर्क असल्याने हुकुमशाहीला कंटाळलेले मतदार आपल्याला संधी देतील असा दावा हाजी अस्लम सय्यद यांनी केला.

 * उमेदवारी अर्ज २४ मार्च रोजी दाखल करणार

हाजी अस्लम सय्यद यांचे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये उतरण्याचे निश्चित झाले असले तरी ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार याची घोषणा ते उद्या करणार आहेत. सय्यद निवडणूक उमेदवारी अर्ज २४ मार्च रोजी दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes