कोल्हापूर महापालिकेच्यावतीने मुख्य रस्त्याचे डांबरी पॅचवर्कची कामे सुरु
schedule10 Sep 24 person by visibility 300 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : पावसाने थोडी उसंती दिल्याने सोमवार रात्रीपासून महापालिकेच्यावतीने शहरांमध्ये मुख्य रस्त्याचे डांबरी पॅचवर्कची कामे सुरु करण्यात आली आहेत. प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी गणेश विसर्जन मार्ग व मुख्य रस्ते तातडीने पॅचवर्क करण्याचे आदेश सर्व उपशहर अभियंता यांना दिले होते. त्यामुळे सोमवारी रात्रीपासून शहरामध्ये पॅचवर्कची कामे सुरु करण्यात आली आहेत.
यामध्ये विभागीय कार्यालय क्र.1 अंतर्गत नवीन वाशीनाका, चिवा बाजार, क्रशर चौक ते कळंबा फिल्टर हाऊस, खराडे कॉलेज ते क्रशर चौक मुख्य रस्त्यांचे डांबरी पॅचवर्क करण्यात आले तर अंबाई टँक परिसर येथे मुरुम पॅचवर्क करण्यात आले. विभागीय कार्यालय क्र.2 अंतर्गत गंगावेश चौक, पाडळकर मार्केट ते रंकाळा स्टँण्ड, टायटन शोरुम ते गोखले कॉलेज चौक. विभागीय कार्यालय क्र.3 अंतर्गत रामकृष्ण हॉटेल ते इंदूमती शाळेजवळील मुख्य रस्त्यांचे डांबरी पॅचवर्क करण्यात आले तर राजाराम तलाव येथील मुख्य रस्त्याचे मुरुम पॅचवर्क करण्यात आले.
विभागीय कार्यालय क्र.4 अंतर्गत लाईन बझार, मुक्त सैनिक वसाहत, दामिनी हॉटेल समोर, लोणार वसाहत मेनरोड परिसरातील मुख्य रस्त्यांचे डांबरी पॅचवर्क करण्यात आले आहे. सदरचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, महादेव फुलारी सुरेश पाटील यांनी करुन घेतली आहेत.